मुंबई : झगमगत्या दुनियेतील लोकांचं खासगी आयुष्य कायम चर्चेत असतं. बॉलिवूडमध्ये नवीन प्रेमाची सुरूवात आणि ब्रेकअप आता सामान्य झालं आहे. पण काही अधुरी प्रेम कहाणी आजही प्रसिग्ध आहेत. रेखा यांना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नावाजलं जातं. त्यांच्या चित्रपटांप्रमाणे त्यांचं खासगी आयुष्य देखील चर्चेत होतं. एक प्रसंग असा आला जेव्हा रेखा यांच्या प्रेम प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधलं. अभिनेते विनोद मेहरा आणि रेखा एकमेकांवर प्रचंड प्रेम करायचे.
पण अभिनेत्याच्या कुटुंबाने अभिनेत्रीला त्यांच्या घरातील सदस्य म्हणून कधीही स्वीकारले नाही. विनोद मेहराच्या आईला तिच्या मुलाचे सहकलाकाराशी असलेले नाते आवडले नाही. आमची सहयोगी वेबसाईट डीएनएच्या बातमीनुसार, विनोद मेहरा आणि रेखा यांचे कोलकात्यात लग्न झाले. विनोद यांनी रेखा यांना आईला भेटायला नेले पण विनोद मेहराच्या आई रेखावर ओरडल्या आणि त्यांचा अपमान केला. रेखाला मारण्यासाठी विनोद मेहराच्या आईने चप्पल देखील उचलली.
विनोद मेहरा यांनी आईला खूश करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या रेखा यांना अपमानित करत राहिल्या. त्यानंतर विनोद मेहरा यांच्या घरातून रेखा रडत बाहेर आल्या. या अपमानास्पद घटनेनंतर, रेखा आणि विनोद मेहरा यांनी संपर्कात राहून परस्पर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर विनोद मेहराने 1988 मध्ये किरणशी लग्न केले.
काय म्हणाल्या रेखा
1973 मध्ये, एका मुलाखतीत रेखा विनोद मेहराच्या आईबद्दल म्हणाल्या, 'त्यांच्यासाठी (विनोदची आई) मी फक्त एक अभिनेत्री नाव्हती, तर भूतकाळ वाईट असलेला अभिनेत्री होती. आणि एक सेक्स सिम्बॉल म्हणून पाहिले जात होतं.'