Kanal Kannan Arrest: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन (Kanal Kannan) याला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह व्हिडीओ (Video) शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. कनल कन्नन याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप डीएमके नेत्याने केला होता. त्याने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. यानंतर सायबर क्राइम पोलिसांनी (Cyber Crime Police) त्याला बेड्या ठोकल्या.
कनल कन्नने ट्विटरला (Twitter) ख्रिश्चन धर्मगुरुचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये धर्मगुरु एका महिलेसोबत नाचत आहे. या व्हिडीओवर आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ही अटकेची कारवाई करण्यात आली.
ANI ने अटकेच्या वृत्ताला दुजोरा देणारं ट्वीट केलं आहे. "कॉलिवूड स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन याला सोशल मीडियावर पादरी महिलेसह डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे," अशी माहिती ANI ने दिली आहे.
Kollywood stunt master and actor Kanal Kannan arrested by cyber crime police in Nagercoil for sharing a video of a pastor dancing with a woman, on social media: Tamil Nadu Police
— ANI (@ANI) July 10, 2023
कनल कन्नन याने 18 जूनला व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओत ख्रिश्चन धर्मगुरु एका महिलेसोबत नाचताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं होतं की "विदेशी धार्मिक संस्कृतीचा हा खरा चेहरा आहे? धर्मांतर केलेल्या हिंदूंनो विचार करा. पश्चाताप". हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर अनेकांनी यावरुन टीका केली होती.
வெளிநாட்டு மத கலாச்சாரத்தின் உண்மை நிலை இதுதான்???!!!!
மதம் மாறிய இந்துக்களே சிந்தியுங்கள்!!!!
மனம் திரும்புங்கள்!!!@hindumunnani_tn @RSSorg @VHPDigital @elangovan_HM @ManaliManoharHM @RajeshHM_org @JSKGopi pic.twitter.com/swPGJJxgnv— kanal kannan (@kannan_kanal) June 18, 2023
कनल कन्ननने तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या अभिनेत्यांसह काम केलं. यामध्ये रजनीकांत, थलापती विजय यासह अनेकांचा समावेश आहे.
कनल कन्नन लोकप्रिय हिंदू संघटना हिंदू मुन्नानीचा प्रदेशाधयक्षदेखील आहे. त्यांच्या कला आणि साहित्य शाखेचे नेतृत्व तो करतो. हिंदू मुन्नईने ट्वीट करत अटकेचा निषेध केला आहे आणि म्हटलं आहे की, राज्य पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात 11 जुलै रोजी दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाईल.
गेल्या वर्षी, कन्ननवा पेरियार ई.व्ही. रामासामी यांच्याविरोधात टिप्पणी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, एका द्रविड संघटनेच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली होती.