सर्व काही देखावाच! घर भाड्याचं अन् हप्त्यांवर कार, एल्विश यादवच्या पालकांचा धक्कादायक दावा

सध्या एल्विश यादव न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाचा त्याच्या कुटूंबीयांवर खूप परिणाम झाला आहे.   नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एल्विशची आई सुषमा यादव आणि वडील राम अवतार यांनी एल्विशवरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

Updated: Mar 20, 2024, 01:40 PM IST
सर्व काही देखावाच! घर भाड्याचं अन् हप्त्यांवर कार, एल्विश यादवच्या पालकांचा धक्कादायक दावा

मुंबई : यूट्यूबर एल्विश यादवच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाहीयेत. गेल्याकाही दिवसांत केल्या गेलेल्या चौकशीत एल्विशने कबूल केलं आहे की, तो रेव पार्टीत सापांच विष सप्लाई  प्रकरणात गुंतलेल्या आरोपींना आपण आधीच भेटला होता.  आता त्याच्यावर विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

सध्या एल्विश यादव न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाचा त्याच्या कुटूंबीयांवर खूप परिणाम झाला आहे.   नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एल्विशची आई सुषमा यादव आणि वडील राम अवतार यांनी एल्विशवरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकराणावर बोतलाना त्याचे पालक भावूक झाले आहेत आणि त्याची बाजू मांडताना दिसत आहे. याचबरोबर आपल्या मुलाविषयी कोणत्याही खोट्या अफवा पसरवू नये अशी विनंतीही त्याचे आई वडिल मीडियासमोर करताना दिसले. याचबरोबर एल्विशच्या नावाचा गैरवापर केला जात आहे. काल ते एल्विशला भेटायला गेल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं. त्याने कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही.  NGO वाले त्याला अडकवत आहेत. असं एल्विशच्या आई वडिलांचं म्हणणं आहे. 

 एल्विशच्या आईने म्हटलं की, माझ्या मुलाने काहीही चूक केलेली नाही आणि तो कधीच करणार नाही. प्ले होत असलेला व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. अशा पार्ट्यांना तो कधीच गेला नाही. मुलाचे नाव हाईप केलं आहे, त्यामुळे एनजीओचे लोकं त्याला मुद्दाम अडकवत आहेत. माझा मुलगा एक निष्पाप आणि साफ मनाचा आहे, त्याने काहीच चुकीचं कधी केलं नाही.

याचबरोबर एल्विशचे वडिलांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,  माझा मुलगा निर्दोष आहे. तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. आम्हाला आमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला प्रत्येक जन्मात असाच मुलगा हवा आहे. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो पूर्णपणे निर्दोष आहे. तो या साप विषाच्या प्रकरणांपासून दूर आहे. बिग बॉस जिंकल्यापासून लोकं त्याला फॉलो करू लागले आहेत. मी काल त्याला भेटून आलो. त्याने कोणत्याही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. आम्हाला का या प्रकरणात गोवलं जातंय हेच कळत नाहीये.
 
याचबरोबर एल्विशच्या पालकांनी सगळे आरोप फेटाळून लावले. इतकंच नाहीतर त्यांना अश्रूदेखील अनावर झाले. आणि त्याचे पालक रडू लागले.  त्यांचा मुलगा जेलमध्ये भुकेला आणि तहानलेला आहे. तीन दिवस आम्हीही काही खाल्लेलं नाही. तो एक नेहमी खूष राहाणारा मुलगा आहे आणि नेहमी आनंदी राहण्याचा सल्ला देतो. त्याला फसवलं जात आहे. त्याला भेटण्यासाठी किती लोकं घराबाहेर उभे असतात. त्याच्यावर लोकांचंही खूप प्रेम आहे. आम्ही हे संपूर्ण प्रकरण आधी गांभीर्याने घेतलं नाही, कारण आम्हाला माहित होतं की, आमच्या मुलाने काहीही केलेलं नाही. मात्र आमच्या मुलाला मोठ्या प्रकरणात गोवलं जात आहे.'' असं एल्विशची आई भावूक होत म्हणाली. 
 
पुढे अभिनेत्याच्या पालकांनी त्याच्या लाईफस्टाईलबद्दल खुलासा केला आणि सांगितलं की, त्यांच्या मुलाकडे कोणतीही लग्जरी गाड्या नाही. या सगळ्या गाड्या  त्याने लोनवर घेतल्या आहेत.  त्याच्याकडे फक्त दोन गाड्या आहेत. फॉर्चूनर आणि वॅगन आर. एल्विशच्या नावावर कोणतीही  प्रॉपर्टी नाही. त्याच्याकडे जमिनीच्या बदल्यात त्याला मिळालेला प्लॉट आहे. इतकंच नाही तर सध्या तो भाड्याच्या घरात राहतोय, एल्विश व्हिडीओसाठी मित्रांच्या गाड्या हायर करतो.  बिग बॉस जिंकल्यानंतर, एल्विशने कपड्यांचं काम केलं.  जॅकेट विकली, यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून तो पैसे कमवतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x