'सुशांतची बहीण नशेत रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायची'

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांचा खुलासा.  

Updated: Aug 19, 2020, 12:23 PM IST
'सुशांतची बहीण नशेत रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायची' title=

मुंबई :  अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियंकावर गंभीर आरोप लावले आहेत. रिया चक्रवर्तीच्या वकिलांच्या सांगण्यानुसार सुशांतची बहीण नशेत चुकीच्या पद्धतीनं रियाला स्पर्श करत होती. त्यामुळे सुशांत आणि रियाच्या नात्यात मतभेद निर्माण होण्यास सुरूवात झाली. रियाचे वकील सतीश मनेशिंदे यांनी एका निवेदनात संपूर्ण घटनेचा उल्लेख केला आहे.

रियाच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, 'जेव्हा रिया आणि सुशांतच्या नात्याला सुरूवात झाली तेव्हा काही महिन्यांनंतर रिया सुशांतच्या घरी राहायला गेली. त्यावेळी सुशांत त्याची बहीण प्रियंका आणि तिचे पती  सिद्धार्थ यांच्या सोबत राहत होता. एप्रिल २०१९ रोजी रिया आणि प्रियंका एका पर्टीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी प्रियंकानं प्रमाणापेक्षा जास्त मद्याचं सेवन केलं असल्याचं रियाच्या वकिलांनी सांगितलं.

दुसऱ्या दिवशी रियाला शूटिंगला जायचं असल्यामुळे ती पार्टीतून निघाली. त्यानंतर घरी आल्यानंतर रिया झोपली तेव्हा सुशांतची बहीण देखील बेडवर झोपली होती आणि रियला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. हे सर्व पाहून रियाघरातूनच निघून गेली. 

घडला सर्व प्रकार तिने सुशांतला सांगितला. यामुळे सुशांत आणि बहीणीचं यावरुन भांडण झालं होतं. या घटनेमुळे सुशांत आणि रियाच्या कुटुंबीयांमधील संबंध सुरुवातीपासूनच ताणले गेले होते. त्यामुळे सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणाऱ्या २० जणांची नावं काढली त्यावेळी रियाचं नाव या यादीमध्ये नव्हते. म्हणून ती अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नाही. असा खुलासा रियाच्या वकिलांनी केला.