शमिता आणि राकेशच्या नात्यावर रिद्धी म्हणते; 'त्याच्या आयुष्यात तो...'

राकेश आणि शमिता यांच्या नात्यावर काय म्हणाली राकेशची पहिली पत्नी?

Updated: Sep 25, 2021, 01:02 PM IST
शमिता आणि राकेशच्या नात्यावर रिद्धी म्हणते; 'त्याच्या आयुष्यात तो...'

मुंबई : अभिनेत्री राकेश बाबट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत आहेत. 'बिग बॉस ओटीटी' च्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. सुरूवातीला ही जोडी फ्कत शोपर्यंत मर्यादित असेल असा अंदाज चाहत्यांसह अनेकांनी वर्तविला. पण बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर देखील दोघे एकमेकांना डेट करत आहेत. शिवाय आम्हाला एकमेकांना अधिक जाणून घ्यायचं आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली. आता राकेशची पहिली पत्नी आणि टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगराने प्रतिक्रिया दिली आहे. 

राकेश आणि शमिताच्या नात्यावर राकेशच्या पहिल्या पत्नीने आनंद व्यक्त केला आहे. रिद्धी म्हणाली, 'या नात्यामुळे राकेश आनंदी आहे तर मी देखील आनंदी आहे...' टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा राकेशचा वैयक्तिक प्रश्न आहे.. असं देखील रिद्धी म्हणाली. 'ज्याप्रमाणे राकेशने शोमध्ये स्वतःला सादर केलं तसाचं तो खऱ्या आयुष्यात देखील आहे...'

शमिता आणि राकेश लवकरच अडकणार विवाहबंधनात?

पुढे रिद्धी म्हणाली, 'वेळ आल्यावरचं तो योग्य काम करण्याचा निर्णय घेतो... त्याला ओरडलेलं आवडतं नाही.. ओरडणं आणि रागावण्याशिवाय तो अडचणींवर मार्ग काढण्यावर अधिक भर देतो...त्यामुळे शमिता आणि राकेश एकमेकांसोबत आनंदी आहेत तर मी देखील आनंदी असल्याची प्रतिक्रिया रिद्धीने दिली आहे.