शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली

 रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं नदी पात्रात, शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली. 

Updated: Nov 9, 2017, 01:38 PM IST

हैदराबाद : रिंकू राजगुरू अर्थात सैराट नंतर आर्ची म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेली, रिंकू राजगुरू ही तेलुगू सैराटचं नदी पात्रात, शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली. 

रिंकू पाय घसरून पडल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तेलुगू सैराटचं शुटिंग सुरू असताना अशी घटना घडली, आर्ची नदीत पडल्याचा हा व्हिडीओ सत्य असल्याचा दुजोरा तिच्या निकटवर्तीयांनीही दिला आहे. 

व्हि़डीओत आर्ची नदीतील दगडावर डान्स करताना दिसते, आणि पाय घसरल्याने प्रचंड वेगाने ती खाली पडली आहे, आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला यात काही दुखापत झाली आहे किंवा नाही. हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे, यूट्यूबवर हा व्हि़डीओ प्रचंड व्हायरल होत आहे.