...ऋषी कपूर यांचा अखेरचा व्हिडिओ

तब्येत ठिक नसूनही, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र कायम होतं...

Updated: Apr 30, 2020, 07:43 PM IST
...ऋषी कपूर यांचा अखेरचा व्हिडिओ title=

मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 67व्या वर्षी त्यांच्या अशा एक्झिटने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. कलाविश्वासह अनेक चाहत्यांनीही ऋषी कपूर यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर यांना एक चाहता गाणं ऐकवत असताना दिसतंय. 

ऋषी कपूर यांचा हा व्हिडिओ आताचा नसून फेब्रुवारी महिन्यातील असल्याचं बोललं जात आहे. मात्र ऋषी कपूर यांच्या जाण्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रुग्णालयातील बेडवर ऋषी कपूर झोपलेले असून चाहता गाणं म्हणत असल्याचं दिसतंय. हे गाणं ऐकताना भावूक झालेल्या ऋषी कपूर यांच्या डोळ्यातील अश्रूचं सारंकाही सांगून जातात. व्हिडिओमध्ये त्यांची तब्येत ठिक नसल्याचं दिसतंय, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र कायम आहे. 

चाहत्याचं त्याचं गाणं म्हणून झाल्यानंतर ऋषी कपूर यांनी त्याला आशिर्वादही दिला. 'माझा आशिर्वाद तुझ्यासोबत आहे. खुप मोठा हो, यश मिळव, मेहनत कर....कारण प्रसिद्धी, पैसा हे सारं काही मेहनतीनंतरच येतं. मेहनतीसह थोडी नशीबाचीही साथ मिळाली तर सर्वकाही ठिक होईल', असं म्हणत त्यांनी चाहत्याला त्यांच्या हास्यासह आशिर्वादही दिला. 

दरम्यान, व्हिडिओमध्ये गायलं जाणारं गाणं ऋषी कपूर यांच्या 'दीवाना' या चित्रपटातलं आहे. 'दीवाना' चित्रपट 1992मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात दिव्या भारती आणि शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटासह त्यातील गाणीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. चित्रपटात ऋषी कपूर यांनी रवी नावाची भूमिका साकारली होती.

  

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x