कॅन्सरमधून सावरलेले ऋषी कपूर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

ऋषी कपूर यांच्या 'झूटा कही का' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Updated: Jul 4, 2019, 12:10 PM IST
कॅन्सरमधून सावरलेले ऋषी कपूर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो. 'प्यार का पंचनामा २' मध्ये झळकलेली सनी सिंह आणि ओमकार कपूर ही जोडी पुन्हा एकदा 'झूटा कही का' या चित्रपटातून रुपेरी पदड्यावर झळकणार आहे. 'झूटा कही का' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

समीप कांग दिग्दर्शित 'झूटा कही का' मध्ये ओमकार कपूर आणि सनी सिंहसह ऋषी कपूर, जिमी शेरगिल, लिलेट दुबे आणि मनोज जोशीदेखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून ऋषी कपूर ९ महिन्यांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत. 

चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर ट्रेंडमध्ये असून ऋषी कपूर यांनीही त्यांच्या ट्विटवर 'झूटा कही का' ट्रेलर शेअर केला आहे. कॉमेडीचा फुल डोस असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. येत्या १९ जुलै रोजी 'झूटा कही का' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.