रितेश देशमुखने संगीतकार विशाल-शेखर यांना विचारलं आपल्या मुलाचं भविष्य

पाहा अतिशय क्यूट व्हिडिओ 

Updated: Jul 30, 2020, 05:21 PM IST
रितेश देशमुखने संगीतकार विशाल-शेखर यांना विचारलं आपल्या मुलाचं भविष्य  title=

मुंबई : असं म्हणतात की, बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात. याचाच प्रत्यय बहुदा अभिनेता रितेश देशमुखला येत असेल. अभिनेता रितेशने इंस्टाग्रामवर बुधवारी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो आपल्या मुलांच टॅलेंट दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांने संगीतकार विशाल-शेखर यांना टॅग केला आगे. 

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याचा मुलगा गाण्याच कौशल्य दाखवताना दिसत आहे. रितेशचा लहान मुलगा राहिल त्याच्या चुलत बहिणीसोबत दिवियानासोबत आयपॅडवर संगीत तयार करताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांचे एक्सप्रेशन अतिशय क्यूट आहेत. 

रितेशने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या व्हिडिओत रितेश मुलांना विचारतोय की, तुम्ही काय करताय? यावर राहिल उत्तर देतोय की, मी एक गाणं तयार करतोय. यानंतर राहिल आयपॅडवर एक गाणं रेकॉर्ड करत आहे.या गाण्याच्या रेकॉर्डिंगने तुम्ही दोघं खुश आहात का असं विचारलं जात. तेव्हा राहिल आणि दिवियाना दोघंही आनंदाने मान डोलवताना दिसत आहेत. 

मुलं कायमच आपल्या पालकांना पाहत असतात. त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असतात.