लेकाला डबलसिट घेऊन जाण्यासाठी बापाची भन्नाट आयडिया, रितेश देशमुखने शेअर केला व्हिडिओ

Riteish Deshmukh Viral Video: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे कॅप्शनही चर्चेत आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 17, 2023, 11:36 AM IST
लेकाला डबलसिट घेऊन जाण्यासाठी बापाची भन्नाट आयडिया, रितेश देशमुखने शेअर केला व्हिडिओ title=
Ritesh Deshmukh Shared Jugadu Father Taking Son On Bike video viral on social media

Riteish Deshmukh Viral Video: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अभिनेत्री जिनीलिया देशमुखसोबतचे त्याचे व्हिडिओही चांगलेच गाजतात. अशातच रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट आल्या आहे. तर, सोशल मीडियावरही हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. 

रितेशने एक्स (ट्विटर)वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या चाहत्यांनीही या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत एक बाप आपल्या मुलाला बाइकवर डबलसिट घेऊन जात आहे. मात्र, लेकाला डबलसीट घेऊन जाण्यासाठी त्याने वापरलेली भन्नाट शक्कल पाहून रितेशही प्रभावीत झाला आहे. त्याला हा व्हिडिओ इतका आवडला आहे की त्याने तो थेट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर यावर प्रतिक्रियाही भन्नाट आल्या आहेत. 

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओत एक वडील आपल्या मुलाला बाइकवरुन घेऊन जात आहेत. मात्र, इतक्या छोट्या मुलाला बाइकवरुन नेणे तसे धोक्याचे आहेच. त्यामुळं त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. बाइकच्या बाजूला बांधलेल्या दुधाच्या किटलीत त्याने मुलाला बसवले आहे. तो मुलगाही शांतपणे त्या किटलीत बसून टुकूटुकू बघत बसला आहे. चिमुकला लेकाला काही दुखापत होऊ नये म्हणून बापाने शोधलेली हा आयडिया लोकांना फारच आवडली आहे. 

रितेश देशमुखनंही हा व्हिडिओ शेअर करत जुगाडू बाप असं कॅप्शन दिले आहे. रितेशने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की, टॅलेन्ट व काळजी दोघांचा उत्तम जम बसवला आहे. तर, एकाने मिल्की कार असं म्हटलं आहे. तर एकाने कमेंट केली आहे की, ही टेक्निक भारताबाहेर गेली नाही पाहिजे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रितेश आणि जिनीलियाबाबत एक अफवा समोर आली होती. एका कार्यक्रमातील जिनीलियाच्या एका फोटोमुळं ती गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर तीला ट्रोलदेखील करण्यात आले होते. मात्र, रितेशने या सर्व चर्चा फेटाळून लावत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. रितेश आणि जिनीलिया यांनी 2012 साली लग्न केले होते. दोघांना दोन मुलं आहेत. रितेश आणि जिनीलियाच्या मुलांचे फोटो व व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय झालेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x