Miss universe 2021 : हरनाझ कौरच्या यशामागे फक्त 'ही' खास व्यक्ती

त्या खास व्यक्तीसाठी खुद्द हरनाझने व्यक्त केल्या भावना  

Updated: Dec 13, 2021, 03:25 PM IST
Miss universe 2021 : हरनाझ कौरच्या यशामागे फक्त 'ही' खास व्यक्ती title=

मुंबई : भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हा विजय फक्त आणि फक्त हरनाझ कौर संधूमुळे भारताला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. हा दिवस सर्व भारतीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. हा विजय एकट्या हरनाझनसून संपूर्ण भारताचा आहे. मिस युनिव्हर्सच्या किताबासाठी हरनाझने मेहनत केली, यात काही शंका नाही. पण तिला मेहनत करण्यासाठी मोठं स्वप्न पाहाण्यासाठी प्रेरण देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीनसून हरनाझची आई आहे. 

हरनाझने फार पूर्वी  मिस युनिव्हर्स होण्याचं स्वप्न पाहिलं. अनेक वर्षांनंतर आज तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. हरनाझने सोशल मीडियावर आईसाठी पोस्ट शेअर केली आहे. आईसोबत फोटो शेअर करत तिने तिच्या यशाचं पूर्ण श्रेय आईला दिलं आहे. माझी आई माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे... असं हरनाझ म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

'आई माझ्या स्वप्नांची निर्माती आहे. तुझ्या शिवाय काही शक्य नाही. फक्त निर्माती नाही तर माझ्या स्वप्नांची आई लिडर आहे.  तू जशी आहेस तशी खंबीर राहा. मला आणि इतरांना प्रेरणा देत राहा! असं म्हणतात, ‘आईच्या प्रेमाला सीमा नाही; ते बिनशर्त आहे.. '

मुलगी मिस युनिव्हर्स झाल्यानंतर आईची प्रतिक्रिया
 "सध्या, मी खूप उत्साही आहे आणि माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. तिच्या जबरदस्त विजयानंतर माझ्या अंगावर शहारे आले. तुम्ही म्हणू शकता ही एका आईची भावना आहे." 

'मी गुरुद्वारामध्ये प्रार्थना करत असताना मी हा सोहळा पाहिला नाही. मी फक्त प्रार्थना करत होते की, हरनाजने ताज जिंकावा आणि देवाला सांगितले होते की माझी मुलगी जिंकली तरच मी घरी जाईन. माझी मुलं मला सतत अपडेट करत होती. जेव्हा ती टॉप 3 मध्ये पोहोचली तेव्हा मी खूप भावूक झाले.'