मराठी अभिनेत्रीच्या वडिलांना कोरोनाची लागण, तिला देखील जाणवली सौम्य लक्षणं

कोरोनाचा वाढता कहर...  

Updated: Jul 20, 2020, 07:06 PM IST
मराठी अभिनेत्रीच्या वडिलांना कोरोनाची लागण, तिला देखील जाणवली सौम्य लक्षणं  title=

मुंबई : फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. या विषाणूची लागण फक्त सामान्यांना होत नसून कित्येक सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीय या धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय ऋतुजाला करोनाची सौम्य लक्षणे जाणवली.  

त्यामुळे तिला घरातचं क्वारंटाइन करण्यात आलं आहे. याबाब महिती ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दोन आठवडे खूप तणावपूर्ण गेले. कारण बाबांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मलासुद्धा सौम्य लक्षणे होती. बाबा रुग्णालयात आणि मी, आई, बहिण घरी क्वारंटाइन असल्याचं तिने सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#gratitudeदोन आठवडे ख़ुप stressful गेले. कारण बाबांची covid-19 test positive आली. मला सुद्धा minor symptoms होते. बाबा hospital आणि मी,आई,बहिण घरी quarantine under medication. बाबा बरे होऊन घरी परत आले. आता ते घरी Isolation मध्ये आणि आम्ही quarantine. चौघं ही आता बरे आहोत. हे सगळं सांगण्याचं कारण एवढ़चं की काळजी घेऊन सुद्धा हा corona क़धी केव्हा कुठे कसा आमच्या भेटीला आला माहित नाही. खुप सतर्क रहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळयात महत्वाचं immunity वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा.#staysafeeveryone

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe) on

त्याचप्रमाणे वडील आता घरी आल्याची माहिती देत तिने  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय करण्याचे चाहत्यांना सांगितले आहे. 'खूप सतर्क रहा. आपली आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शक्य ते सगळे उपाय करा.' अशी पोस्ट करत तिने काळजी घेण्याचे आवाहन केलं.

दरम्यान,  देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही ११,१८,०४३ इतकी झाली आहे. ज्यामध्ये ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, ७,००,०८७ रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळं जीव गमवावा लागलेल्यांची संख्या २४,४९७ वर पोहोचली आहे.