Rutuja Bagwe Actor Photo in House: सध्या अभिनेत्री ऋतूजा बागवे हिची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. मराठी सेलिब्रेटी हे नवं घर घेतात आणि मग त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली असते. त्यांच्या नव्या घराचे व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. त्यांच्या नव्या घराचे फोटोही जोरात व्हायरल होतात. आपल्या परिवारासोबत त्यांच्या गृहप्रवेशाचे किंवा सत्यनारायणाच्या पूजेचे फोटो असोत किंवा इतर काही चाहत्यांमध्ये त्यांची चर्चा असते.
अनेकांना असं वाटतं असतं की यांच्यासारखेच आपणही घरं घ्यावे आणि खूप एन्जॉय करावे. असं घर आपल्याला कधी मिळणार अशीही सुप्त इच्छा आपल्या मनात येते. सध्या अभिनेत्री ऋतुजा बागवेनं घेतलेलं घरं पाहून सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. यावेळी तिच्या घराचे फोटोही जोरात व्हायरल झाले आहेत. यावेळी तिनं आपल्या घरात एका खास व्यक्तीचाही फोटो लावला आहे.
सध्या तिनं यावेळी तिच्या घरात लावलेल्या या फोटोची खासियत सांगितली आहे. एका मुलाखतीतून ती म्हणाली की, ''रणबीर कपूर मला प्रचंड आवडतो. तो माझा आवडता अभिनेता आहे. सकाळी उठल्यावर त्याचा फोटो समोर दिसावा असं नेहमी वाटायचं म्हणून घरातल्या भिंतीवर खास रणबीरचा फोटो लावून मी घेतला आहे. प्रत्येक मुलीला माझ्या घरात आल्यावर ही भिंत आवडते'', असं ती म्हणाली. खरतंर आपल्या बेडरूममध्ये कुठल्या ना कुठल्या सुपरस्टारचा, आवडत्या कलाकाराचा फोटो असावा असं नेहमीच वाटतं असतं. सोबतच आपल्या बॉयफ्रेंडचाही फोटो असावा असंही वाटतं असते. त्यामुळे ऋतुजा बागवेची ही क्यूट गोष्ट पाहून सगळेच आनंदी झाले आहेत.
हेही वाचा : 'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..

काही दिवसांपुर्वी ऋतुजा बागवे हिनं ठाण्यात आलिशान घरं घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची जोरात चर्चा आहे. ऋतुजानं अनेक नाटकांमधून, चित्रपट आणि मालिकांमधून कामं केली आहेत. त्यामुळे तिचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तिनं आपल्या नव्या घराचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातून हे फोटो तर अल्पावधीतच व्हायरल झाले आहेत. यावेळी सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे तिच्या वॉलवर दिसणाऱ्या रणबीर कपूरच्या फोटोची. यावेळी तिच्या वॉलवरील हा फोटो तिनं का लावला आहे याबद्दलही तिनं खुलासा केला आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.