कार्तिकी गायकवाडच्या साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिलात का?

असा पार पडला 'लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा  

Updated: Jul 30, 2020, 01:12 PM IST
कार्तिकी गायकवाडच्या साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिलात का?  title=

लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेलं आयुष्य बऱ्याच अंशी अनलॉकदरम्यान पूर्वपदावर येत असताना काही कौटुंबीक कार्यक्रमांनीही पुन्हा एकदा जीवनात रंग भरण्याचं काम सुरु केलं आहे. 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या त्या चिमुरड्या कार्तिकी गायकवाडचा चेहरा आठवतोय? 

'खंडेरायाच्या लग्नाला ..' या गाण्यानं अक्षरश: व्यासपीठावर अधिराज्य गाजवणाऱ्या याच चिमुरडीनं आता आयुष्याच्या नव्या पर्वात प्रवेश केला आहे. कार्तिकी कितीही मोठी झाली, तरीही तिची ओळख मात्र लिटिल चॅम्प्समुळेच कायम आहे. अशा या युवा गायिकेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. 

खुद्द कार्तिकीनंच सोशल मीडियावर साखरपुडा सोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. आता कार्तिकीने साखरपुड्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत कार्तिकीचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. साखरपुडा सोहळ्याच्या वेळी पायघोळ गाऊनमध्ये कार्तिकीचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. तर, रोनित पिसे हा तिचा जोडीदारही अगदी शोभून दिसत होता. 

रोनित हा बिझनेसमन असून संगीतात त्याला रुची आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत कार्तिकीचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे.