हृतिकच्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवर सुजैन खानची प्रतिक्रिया

सबा आझाद आणि हृतिक रोशनच्या डेटिंगच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. 

Updated: May 30, 2022, 09:45 PM IST
हृतिकच्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवर सुजैन खानची प्रतिक्रिया title=

मुंबई : सबा आझाद आणि हृतिक रोशनच्या डेटिंगच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.  या दोघांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीच सांगितलं नसलं तरी सतत हे वृत्त समोर येतं आहे, कारण हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकमेकांचा हात धरुन जाताना कॅमेरात कैद झाले आहेत.  

अलीकडेच करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त दोघंही रेड कार्पेटवर एकत्र दिसले. सबा आझाद हृतिकच्या कुटुंबाच्या आणि एक्स पत्नी सुझैन खानच्या खूप जवळ आहे. दोघंही एकमेकांच्या पोस्टवरील कमेंट्समध्ये प्रेम दाखवत असतात आणि दोघंही अनेक प्रसंगी एकत्रही दिसतात.

सबाने अलीकडेच तिच्या आगामी चित्रपट मिनिममच्या सेटवरील स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. छोट्या व्हिडिओमध्ये सबाने स्वतःचंचं कौतुक करताना मिरर सेल्फी घेतला आहे. सुझनने या व्हिडिओवर पहिली प्रतिक्रिया दिली. तिने लिहिलं, "वाह साबू." प्रत्युत्तरात सबाने सुझानचे निकनेम घेतलं आणि म्हटलं, "थँक्स माय सूजलू."

सुजैन खान हृतिकची पहिली पत्नी आहे आणि दोघांना दोन मुलं आहेत. सध्या ती अर्सलान गोनीला डेट करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी त्यांचं नातं अधिकृत केलं. सुझैन तिच्या इंटिरियर डिझायनिंग प्रोजेक्टमध्ये व्यस्त असते. तर सबा मिनिममचा एक भाग बनणार आहे. ज्यामध्ये नमित दास, गीतांजली कुलकर्णी आणि इतर कलाकार असतील.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या प्रोजक्टविषयी बोलताना सबाने लिहिलं, "लॉरी हे कदाचित मी साकारलेले सर्वात कठीण पात्र आहे. मला ही भूमिका खूप आवडली आणि त्यातून एक अभिनेत्री म्हणून माझी क्षमता दिसून येईल.