नवीन वर्षात उरणकरांना 25 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार, कसं ते जाणून घ्या!

Electric Speed Boat In Mumbai: उरणकरांना आता अवघ्या 25 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार आहे. कसं ते जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 27, 2024, 01:31 PM IST
 नवीन वर्षात उरणकरांना 25 मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार, कसं ते जाणून घ्या!  title=
from gateway of india to jnpa in just 25 minutes from electric speed boat by february 2025

Electric Speed Boat In Mumbai: उरणकरांना अवघ्या 25 मिनिटांत गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. जेएनपीए प्रशासनाने प्रदूषणविरहित स्पीड बोडचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळं नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे. स्पीड बोटीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या निधीला जेएनपीए प्रशासनाला मंजुरी दिली आहे. फेब्रुवारीपासूनच हा प्रवास सुरू होऊ शकतो. 

जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडियादरम्यानचा जलप्रवास फेब्रुवारी महिन्यापासून 2025 करु शकणार आहेत. इलेक्ट्रिक स्पीड बोटच्या माध्यमातून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएपर्यंता प्रवास फक्त 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सामान्य बोटीतून हे अंतर पार करण्यासाठी साधारण एक तासांचा वेळ लागतो. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी जेएनपीएने इलेक्ट्रिक स्पीड बोट म्हणजेच ई-वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जेएनपीएने दोन इलेक्ट्रिक स्पीड बोट बनवण्याची ऑर्डर माझगाव डॉकला देण्यात आली आहे. फेब्रुवारीपर्यंत स्पीड बोट बनवून तयार होणार आहे. जेएनपीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार, इलेक्ट्रिक स्पीड बोटचे संचालन जेएनपीए करणार नाही. तर एका दुसऱ्याच संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. जेएनपीएकडे इलेक्ट्रिक स्पीड बोटची सुविधा आहे मात्र आता या सेवेचा लाभ सर्वसामान्यांनाही मिळणार आहे. 

एकाच वेळी 25 नागरिक प्रवास करु शकतात

इलेक्ट्रिक स्पीड बोटमध्ये एकाचवेळी 20 ते 25 नागरिक प्रवास करु शकतात

वॉटर टॅक्सीची बॅटरी 30 मिनिटांत चार्ज होईल

जवळपास 64 KWH क्षमतेच्या एक बॅटरी एकाचवेळी चार्ज झाल्यानंतर 2 ते 4 तासांपर्यंत समुद्रात चालू शकते. 

गेट वे ऑफ इंडिया ते जेएनपीए, एलिफेंटा, अलिबाग व अन्य मार्गांवर चालणार आहे. 

जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाकडी बोटींची जागा स्पीड बोट घेणार आहे. यामुळं उरणकरांना वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. अवघ्या 25 मिनिटांत गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत येण्यासाठी किंवा उरणला पोहोचण्यासाठी स्पीड बोटचा पर्याय खूप चांगला आहे.