सबसे कातिल... हुबेहूब गौतमीसारखी दिसणारी ही सुंदरा आहे तरी कोण?

'सबसे कातिल' असं म्हटलं की, डोळ्यासमोर सगळ्यात पहिला चेहरा येतो तो म्हणजे गौतमी पाटीलचा. गौतमी पाटीलचा आज खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. गौतमीचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीने आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण आता एक गौतमी सारखी हुबेहूब दिसणारी मुलगी सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

Updated: Jan 9, 2024, 12:48 PM IST
सबसे कातिल... हुबेहूब गौतमीसारखी दिसणारी ही सुंदरा आहे तरी कोण? title=

मुंबई : 'सबसे कातिल' असं म्हटलं की, डोळ्यासमोर सगळ्यात पहिला चेहरा येतो तो म्हणजे गौतमी पाटीलचा. गौतमी पाटीलचा आज खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची प्रत्येक अदा तिच्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. गौतमीचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीने आपल्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण आता एक गौतमी सारखी हुबेहूब दिसणारी मुलगी सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी ही मुलगी गौतमीची बहिण असल्याचा तर्क वितर्क लावला आहे. मुख्य म्हणजे तिची डान्स स्टाईल आणि तिच्या कपड्यांची स्टाईलही गौतमी सारखी आहे.  तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. सध्या या तरुणीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला या सुंदरीबद्दल सांगणार आहोत. 

गौतमी सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या तरुणीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या नव्या तरुणीने नृत्य क्षेत्रात दमदार एन्ट्री घेतली आहे. गौतमीप्रमाणेच  तिच्या सारख्या दिसणाऱ्या तरुणीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही तरुणी गौतमी पाटील सारखी दिसते आणि तिच्या सारखाच उत्तम डान्सही करते. अनेकांनी असंही म्हटलंय की, ती जेव्हा स्टेडवर डान्स करते तेव्हा गौतमी पाटील डान्स करत असल्याचा भास होतो.  तिचे हावभाव, डान्स करण्याची पद्धत एवढंच काय तर तिचा पेहरावही गौतमी पाटील सारखाच आहे.

गौतमी पाटील सारखी दिसणारी ही तरुणी तनुश्री पुणेकर आहे. तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तनुश्री तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते. तिची डान्सची स्टाईल आणि तिचा पेहराव पाहून अनेकांनी ती गौतमी पाटील सारखी दिसत असल्याचं म्हटलं आहे. tanushri_punekar123_ या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ती तिचे डान्सचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. मात्र नुकताच तनुश्रीने एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने म्हटलंय की, तिची कोणीही गौतमीसोबत तुलना करु नये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तनुश्री म्हणाली आहे की, ''नमस्कार मी तनुश्री पुणेकर. सर्वांना विनंती आहे कोणीही मला गौतमी पाटील किंवा डुप्लिकेट असं काहीही बोलू नका. मी तनुश्री पुणेकर आहे तर सर्वांनी तनुश्री पुणेकरच म्हणा आणि सगळे एवढं प्रेम देत आहे त्यासाठी सर्वांचे आभारी आहे. असेच प्रेम देत राहा. धन्यवाद'' तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिची तुलना गौतमीसोबत केल्यामुळे तनुश्रीने नाराजी व्यक्त केली आहे.