...म्हणून 'सेक्रेड गेम्स २'च्या प्रदर्शनास आणखी विलंब

'सेक्रेड गेम्स २' ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज कधी रिलीज होईल यावरून अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. 

Updated: Jun 18, 2019, 11:58 AM IST
...म्हणून 'सेक्रेड गेम्स २'च्या प्रदर्शनास आणखी विलंब title=

मुंबई : 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी विश्वाच्या थरारावर आधारलेल्या 'सेक्रेड गेम्स २' च्या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सीरिजचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पण ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज कधी रिलीज होईल यावरून अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. वेब सीरिज रिलीज होण्यात विलंब होणार असल्याचे समोर येत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'सेक्रेड गेम्स २' ऑक्टोबर महिन्यात रिलीज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दकी यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे सीरिजची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A lone cop, a fabled thug and a rabid city in a race for survival. Sacred Games premieres 6 July.

A post shared by Sacred Games (@sacredgames_tv) on

एकीकडे, सैफ त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी लंडनमध्ये व्यग्र आहे. नुकताच तो विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत 'भारत-पाकिस्तान' सामन्यात विराटसेनेचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित होता. तर दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दकी त्याच्या 'बोले चुडिया' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. 

दोन्ही अभिनेत्यांचे व्यस्त वेळापत्रक पाहता 'सेक्रेड गेम्स २' च्या रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'ला चाहत्यांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 'सेक्रेड गेम्स २' मध्ये सैफ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या शिवाय अभिनेता पंकज त्रिपाठीसुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर 'सेक्रेड गेम्स २'मध्ये कोण-कोणत्या रहस्यांचा उलगडा होणार, हे पाहाणे औचुक्याचे ठरणार आहे. २००६ साली लेखक विक्रम चंद्रा लिखीत एका कादंबरीवर वेब सीरिजची कथा आधारलेली आहे.