'जगातील सर्वात वाईट गोष्ट...' घटस्फोटाबद्दल सैफ अली खान व्यक्त

. सैफ-अमृता यांचं १९९१ मध्ये लग्न झालं होतं 

Updated: Jan 15, 2022, 05:01 PM IST
'जगातील सर्वात वाईट गोष्ट...' घटस्फोटाबद्दल सैफ अली खान व्यक्त title=

मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्नापासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंतच्या बातम्या खूप चर्चेत असतात. सैफ-अमृता यांचं १९९१ मध्ये लग्न झालं. लग्नाच्या वेळी सैफ अली खानचं वय अवघं २१ वर्षे होतं. त्याचबरोबर अमृता सिंगचं वय 33 वर्षे होतं. सैफ-अमृता यांच्या वयात १२ वर्षांचा फरक आहे.

इतकंच नाही तर 1991 मध्ये म्हणजे लग्नाच्यावेळी जिथे अमृता सिंग इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिथे सैफ अली खानने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केलं नव्हतं. मात्र, या लग्नापासून सैफ-अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत.

त्याचबरोबर, लग्नाच्या 13 वर्षानंतर म्हणजेच 2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा घटस्फोट झाला. असं म्हटलं जातं की त्यांच्यातील मतभेद आणि भांडण इतकं वाढलं होतं की त्यांना घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सैफला एका मुलाखतीत या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

ज्यावर अभिनेता म्हणाला होता, 'ही जगातील सर्वात वाईट गोष्ट होती. यातून मी कधी सावरेल असं वाटत नाही. अभिनेता पुढे म्हणाला की, मी अनेकदा स्वत:ला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की जे काही घडले ते आता मी बदलू शकत नाही.

अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूर खानसोबत २०१२ मध्ये लग्न केलं. त्याचबरोबर अमृता सिंगने मुलांच्या संगोपनासाठी लग्न केलं नाही आणि ती आता सिंगल मदर आहे.