सैफचा आगामी चित्रपटातील खतरनाक लूक पाहिलात का?

सैफचा हा लूक पाहाच...

Updated: Aug 16, 2019, 03:25 PM IST
सैफचा आगामी चित्रपटातील खतरनाक लूक पाहिलात का? title=

मुंबई : बॉलिवूड नवाब सैफ अली खान सध्या त्याच्या नेटफ्लिक्सवरील बहुप्रतिक्षित 'सेक्रेड गेम्स 2'मुळे चर्चेत आहे. 'सेक्रेड गेम्स 2'मध्ये सैफने पोलीस ऑफिसर सरताज सिंगची भूमिका साकारली आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स 2'नंतर सैफचा त्याच्या आगामी चित्रपटासाठीचा खतरनाक लूक समोर आला आहे. 

सैफ अली खान आज त्याचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवशीच त्याच्या आगामी 'लाल कप्तान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सैफ नागा साधूच्या लूकमध्ये दिसतोय. 36 सेकंदाच्या टीझरमध्ये सैफच्या या जबरदस्त लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.  

टीझरमध्ये सैफ चेहऱ्यावर राख लावताना दिसतोय. काजळ, पगडी, लांब दाढी-मिशी असलेला सैफचा लूक पहिल्या 20 सेकंदातच काहीशी भीती, उत्सुकता नक्कीच वाढवतो. 

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सैफच्या या खतरनाक लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळतेय. 'लाल कप्तान' येत्या 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नवदीप सिंह यांनी 'लाल कप्तान' चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.  इरोज इंटरनॅशनल आणि आनंद एल राय यांच्या 'कलर येलो प्रोड्क्शन'ने चित्रपटाची निर्मिती केली आहे. नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान'मध्ये जोया हुसैन, दीपक डोबरियाल आणि मानव विज भूमिका साकारणार आहे.