रणवीर सिंहसोबत 'सेट' आकाश ठोसर

सैराट सिनेमातून सिनेसृष्टीत आकश ठोसरने केलं पदार्पण 

Updated: Nov 9, 2019, 10:49 AM IST
रणवीर सिंहसोबत 'सेट' आकाश ठोसर

मुंबई : अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला आकाश ठोसर 'सैराट' सिनेमातून जगभरात पोहोचला आणि लोकप्रिय ठरला. परश्याची भूमिका साकारून आकाश ठोसरने सिनेक्षेत्रात आपली जागा निर्माण केली. 'सैराट' नंतर आकाश ठोसर अनेक छोट्या छोट्या गोष्टी करताना दिसला. 'एफयू' सिनेमा 'लस्ट स्टोरी'वेबसिरीज या दोन गोष्टींनंतर आता आकाश जाहिरातीमध्ये देखील झळकला आहे. 

बॉलिवूडचा 'बाजीराव' ठरलेला अभिनेता रणवीर सिंहसोबत आकाश ठोसरने स्क्रिन शेअर केली आहे. 'सेट-वेट'च्या जाहिरातीमध्ये आकाश आणि रणवीर सिंह एकत्र दिसले आहेत. आकाशने ही जाहिरात इंस्टाग्रामवर शेअर केली असून Sada Sexy Raho Man... असं म्हणतं रणवीर सिंहला टॅग केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sada Sexy Raho Man @ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

आकाश ठोसरची गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लूकमुळे चर्चा आहे. आकाश ठोसरने 'सैराट' सिनेमात गावरान मुलाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल हा लक्षवेधी ठरला. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांनी अभिनयाची पार्श्वभूमी नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पहिल्या सिनेमानंतर या दोघांची वेगवेगळी काम सुरूच आहेत. असं असताना आकाश ठोसरने बॉलिवूडचा लक्षवेधी अभिनेता रणवीर सिंहसोबत काम केलं आहे.

रणवीर सिंह '83' या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार आहे. अभिनेता रणवीर सिंह लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत काम करणार आहे. '83' मध्ये दीपिका रणवीर सिंहची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणार आहे.