मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत झळकणार 'रिंकू'

रिंकु राजगुरूच्या अभिनयाच्या कक्षा रुंदावल्या

Updated: Nov 20, 2019, 04:11 PM IST
मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत झळकणार 'रिंकू'

मुंबई : 'सैराट' (Sairat) सिनेमानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरू (Rinku Rajguru) लवकरच एका डिजिटल वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. रिंकु राजगुरूने हिंदी सिरीजमध्ये पदार्पण केलं असून मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. रिंकुने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे.  

अभिनेता ताहिर शब्बीरने 'बेपनाह' (Bepannah) आणि 'निशा और उसके कझिन्स' (Nisha Aur Uske Cousins)आता दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ताहिर हॉटस्टार (Hotstar) वर '100' नावाची वेब सिरीज करत आहे. यामध्ये रिंकु राजगुरू काम करत आहे. 

ताहिरच्या (RAT FILMS) रॅट फिल्म या बॅनर अंतर्गंत इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रिंकु राजगुरू यामध्ये खूप महत्वाचा भूमिका साकात आहे. तसेच या वेब सिरीजमध्ये ताहिर आणि फोर मोअर शॉर्टस (4 more shots) फेम राजीव सिध्दार्थ देखील आहेत. ताहिर नुकताच नेटफ्लिक्स (Netflix) वरील गिल्टी (Guilty) आणि वूटवरील (Voot) लॉ अॅण्ड ऑनर (Law and Honour) या वेब सिरीजमध्ये दिसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Great things never come from comfort zone

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

या अगोदर रिंकु राजगुरूचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आले होते. यामध्ये तिचा हटके लूक पाहायला मिळाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

There is no land like the land of your childhood

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

'सैराट'नंतर रिंकुचा 'कागल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.