पाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट'ची निवड

2016 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खास होतं. सैराट या सिनेमाने अक्षरशः वेड लावलं होतं. आता नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा पाकिस्तानमध्ये 'झिंगाट' मस्ती करायला सज्ज झाला आहे. पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. एका बाजूला पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावरून लाद सुरू असताना या सिनेमांची निवड होणं ही अनोखी गोष्टी आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 28, 2018, 04:43 PM IST
पाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट'ची निवड  title=

मुंबई : 2016 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खास होतं. सैराट या सिनेमाने अक्षरशः वेड लावलं होतं. आता नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा पाकिस्तानमध्ये 'झिंगाट' मस्ती करायला सज्ज झाला आहे. पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. एका बाजूला पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावरून लाद सुरू असताना या सिनेमांची निवड होणं ही अनोखी गोष्टी आहे. 

या सिनेमांची झाली निवड 

पाकिस्तानमध्ये पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. हे आयोजन कराचीमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधी असणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये एकमेव मराठी सिनेमा ‘सैराट’सह एस.एस.राजामौलीचा बाहुबली, डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स दाखवले जाणार आहेत. राजामौली यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे.”

राजामौलीचा बहुचर्चित बाहुबली-2 द कन्क्लूजन आणि सैराट या दोन्ही सिनेमांनी उत्तम कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे चांगलेच यशस्वी ठरले. या सिनेमांनी आपापल्या भाषेत एक वेगळा बेंचमार्क निर्माण केला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x