अबे तुने क्या किया ये? Transwoman साईशानं Kiss करताच 'तो' विचित्रपणे वागला आणि....

मुनव्वरच्या शेजारी बसली आणि तिनं त्याला कवेत घेत गालावर किस केलं.   

Updated: Apr 28, 2022, 12:29 PM IST
अबे तुने क्या किया ये? Transwoman साईशानं Kiss करताच 'तो' विचित्रपणे वागला आणि....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिअॅलिटी शोची परिभाषा गेल्या काही वर्षांमध्ये 360 अंशांनी बदलली आहे. नव्या संकल्पना आणि नव्या चेहऱ्यांनी रिअॅलिटी शोच्या लोकप्रियतेत भर टाकण्यास सुरुवात केली. पण, यासोबतच हे सर्व प्रकरण वादाच्या भोवऱ्यातही अडकताना दिसलं. सध्या अशाच बहुविध चर्चांमुळं लक्ष वेधणारा रिअॅलिटी शो, म्हणजे Lock Upp. 

हजारो प्रेक्षकांसाठी आकर्षक विषय ठरणाऱ्या या रिअॅलिटी शोमध्ये ट्रान्सवुमन साईशा शिंदे आणि मुनव्वर फारूकी यांच्या केमिस्ट्रीनं भलत्याच चर्चांना वाव दिला आहे. (Saisha munavvar faruqui)

साईशा आणि मुनव्वरचं एकमेकांशी फ्लर्ट करणं, खट्याळपणे बोलणं हे सर्व ठीक. पण, आता तर तिनं मर्यादाच ओलांडल्या. 

प्रिन्स नरुला आणि मुनव्वर बोलत असतानाच तिथं साईशा आली. मुनव्वरच्या शेजारी बसली आणि तिनं त्याला कवेत घेत गालावर किस केलं. 

साईशानं त्याला इतक्या जोरात किस केलं, की तिच्या ओठांचे ठसेच गालांवर उमटले. ठसे इतके मोठे होते की ही पप्पी नाही, पप्पा आहे असं म्हणत प्रिन्सनं तिची खिल्ली उडवली. 

'अबे ये तुने क्या किया', असं म्हणत मुनव्वरनंही तिला प्रश्न केला. कारण, क्षणार्धापूर्वी तिथं काय झालं हेच त्याला कळेना. यावर, 'मी काय करु?' माझे ओठच मोठे आहेत असं म्हणत साईशा पाऊट करताना दिसली. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला ज्यामुळं एकच चर्चा झाली. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंटही केल्या. सायशा आणि मुनव्वरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या कमाल गाजत आहे, किंबहुना या शोच्या लोकप्रियतेमध्येही ही केमिस्ट्री भर टाकताना दिसत आहे.