close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमर फोटो स्टुडिओला सखी गोखलेचा अलविदा !

काही दिवसांपूर्वी 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकातून एक कलाकार बाहेर पडणार असल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली होती. 

Updated: Jul 22, 2018, 10:56 AM IST
अमर फोटो स्टुडिओला सखी गोखलेचा अलविदा !

मुंबई : काही दिवसांपूर्वी 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकातून एक कलाकार बाहेर पडणार असल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली होती. मात्र ती व्यक्ती कोण? हे गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आलं होते. अखेर अभिनेत्री सखी गोखले या नाटकामधून बाहेर पडत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

सखी का पडतेय बाहेर ? 

अमर फोटो स्टुडिओ नाटकाभर एनर्जिटिक असणारं 'तनू' हे पात्र सखी साकारत होती. 'तनू' या पात्राने रसिकांच्या मनात खास जागाही बनवली होती. मात्र सखीने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही महिन्यात सखी लंडनला उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. त्यामुळे सखीला 'अमर..' सोडावं लागणार आहे.  

चाहत्यांचे आभार 

सुबक आणि कलाकारखाना यांची एकत्र निर्मिती असलेलं 'अमर...' हे नाटक अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीला उतरले होते. सखी गोखले या नाटकामध्ये केवळ अभिनेत्री नसून अमेय वाघ आणि सुव्रत जोशीसोबत सहनिर्मात्याच्याही भूमिकेत  होती. 

दुनियादारी या मालिकेपासून सखी, सुव्रत, अमेय आणि पूजा ठोंबरे हे कलाकार एकत्र काम करत आहेत. मालिका संपल्यानंतर पुन्हा नाटकांच्या माध्यमातून हा चमू पुन्हा रसिकांच्या भेटीला नव्या ढंगात आल्याने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली. 

सखी गोखले  'अमर फोटो स्टुडिओ'मधून बाहेर पडणार हे समजल्यावर चाहत्यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. या शुभेच्छांचा स्वीकार करताना मला तुमच्या 'बेस्ट लक' ची गरज असल्याची खास पोस्ट सखीनेही सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

 

By now most of you must know that soon I’m going to bid farewell to my most dearest Amar Photo Studio’s team. Its a very big decision and it has taken a lot of courage to come to it. I have been planning my higher education for a while now, for which I am finally taking off in a few months. I am extremely excited and nervous and since the news came out everyone has been nothing but kind and supportive of me on social media. It really means a lot to me that all of you are wishing me luck, I absolutely need it and will be eternally grateful to all you :) I’ll take a moment here to thank my entire Amar team for all the encouragement they’ve given me. And again, thank you for loving my Tanu. But the show must go on. Here’s a list of my last shows! Do come, would love to see you all one last time  21st July - 9.30pm, Yashwant Rao Chavan, Kothrud. 22nd July - 9:30pm, Balgandharva, JM Road. 28th July - 3.30pm, Shivaji Mandir, Dadar. 29th July - 4.30pm, Vasudev Balwant Phadke, Panvel. 4th Aug - 8:30pm, Gadkari Rangayatan, Thane. 6th Aug - 4pm, Prabhodhankar Thackeray, Borivali. 11th Aug - 12.30pm, Yashwantrao Chavan,Kothrud. 12th Aug - 4pm, Savitribai Phule, Dombivli.

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

 

सखी गोखले पुढील महिनाभर काही प्रयोगांमध्ये काम करणार आहे. मात्र नाटकामध्ये आता नवी 'तनू' कोण असेल याबाबत आता चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.