सलमान खान आणि कतरीनाने चाहत्यांना दिली गुडन्यूज

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बऱ्याच दिवसांपासून 'या' कारणामुळे चर्चेत आहे.

Updated: Jul 24, 2021, 07:19 PM IST
 सलमान खान आणि कतरीनाने चाहत्यांना दिली गुडन्यूज

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान बऱ्याच दिवसांपासून आपल्या आगामी ‘टायगर 3’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे चाहते पुन्हा एकदा त्याला स्क्रिनवर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमान कतरिना कैफसोबत रोमांस करताना दिसणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटाविषयी एक अपडेटही समोर आली आहे.

'टायगर 3'च्या शूटिंगला सलमान-कतरिनाने सुरुवात केली आहे.
सलमान आणि कतरिनाने आपल्या सस्पेन्स थ्रिलर 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात केली होती, मात्र कोरोना साथीच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शूटींग थांबवण्यात आली. एका सूत्रानुसार, 'टायगर 3चं नवीन शेड्यूल आज यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये सुरू झालं आहे. हा एक कडक सुरक्षा व्यवस्था असलेला सेट आहे. ईथून कोणतेच फोटो लिक होत नाहीत.

सलमान-कतरिनाचं फिटनेस ट्रेनिंग
सूत्रांनी पुढे म्हटलं आहे की, "सलमान आणि कतरिनाच्या फिटनेसचं वेळापत्रक तसंच फिटनेसचं परीक्षण केलं जाईल. याचा ओवरसीज कार्यक्रम परदेशात  ऑगस्टच्या मध्यापासून सुरू होणार आहे. सलमानने यापूर्वी कधीही न केलेली बॉडी तयार केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

याआधीचे दोन भाग झाले होते हिट 
कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या सिनेमाचा पहिला भाग २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. दुसरा भाग 'टाइगर जिंदा है' 2017मध्ये प्रदर्शित झाला होता आणि अली अब्बास जफर दिग्दर्शित 'टायगर 3' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.