अंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि...

Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली. यावेळी अंकितासमोर सलमान खाननं विकी जैनविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 27, 2023, 05:53 PM IST
अंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि... title=
(Photo Credit : Social Media)

Ankita Lokhande and Vicky Jain : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघेही 'बिग बॉस 17' च्या घरात एन्ट्री केली आहे. अंकिता आणि विकी हे दोघेही त्या शोमध्ये गेल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. त्या दोघांच्या वेगळ्या पर्सनॅलिटी पाहायला मिळत आहेत. शोच्या दुसऱ्या वीकेंडचं शूटिंग पूर्ण झालं. यावेळी पहिल्या विकेंडपेक्षा सलमान जास्त रागावलेला दिसला. त्यानं स्पर्धकांना चांगलंच सुनावलं. इतकंच नाही तर सलमाननं अंकिताचा पती विकी जैनविषयी देखील अनेक धक्कादायक खुलासे केले. 

'बिग बॉस 17' मध्ये अंकिताचं पहिलं भांडण हे खानजादीसोबत झालं होतं. दोघांमध्ये वाद इतका वाढला की सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती. वीकेंड का वारमध्ये सलमान खाननं सांगितलं की या सगळ्याचा मास्टर माइंड हा विकी जैन आहे. सलमाननं अंकितासोबत यावर चर्चा केली आणि शोमध्ये त्यांच्या पर्फॉर्मन्सविषयी अपडेट दिली. सलमाननं अंकिताला सांगितलं की बिग बॉसच्या घरात ती तिची ओळख गमावत आहे. तर विकीला एक्सपोज करत सलमान खान म्हणाला की त्यानंच खानजादीला भांडण करण्यासाठी प्रवृत्त केलं. 

सलमान खान म्हणाला की तू तुझ्या नवऱ्यासोबत शोमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि तुझा हा नवरा खानजादीला सांगतो की तुझ्यासोबत भांड. हे ऐकताच विकीच्या शेजारी बसलेली अंकिता भावूक होते. तर विकी स्वत:चा बचाव करत तो केवळ विनोद करत होता असे सांगितले. यावर सलमाननं तत्काळ विकीचे हे वक्तव्य फेटाळून लावले आणि म्हणाला की, हा विनोद नव्हता. सलमानकडून विकीचे सत्य ऐकून अंकिताला अश्रू अनावर झाले. दरम्यान, आता पुढे जाऊन त्या दोघांमध्ये काय होतंय हे पाहण्यासाठी सगळे उस्तुक आहेत. 

हेही वाचा : कतरिना होती 'गोल्ड डीगर'? म्हणे... लॉन्ड्रीपासून सगळी बिलं रणबीर भरायचा

'बिग बॉस 17' च्या घरातून अॅलिमिनेट होण्यासाठी या आठवड्यात 6 स्पर्धक नॉमिनेट करण्यात आले आहेत. यात ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, सोनिया बंसल, सनी आर्या, खानजागी आणि सना रईस खान यांची नावं आहेत. या आठवड्यात या सहा पैकी एकाचा शोमधील प्रवास थांबणार आहे.