पावडर विकणाऱ्या 'या' तरुणीला अचानक मिळाला सलमानचा चित्रपट, रातोरात झाली सुपरस्टार!

Bollywood News : पावडर ब्रँडची जाहिरात करणाऱ्या तिला अचानक एका चित्रपट मिळाला आणि ती रातोरात सुपरस्टार झाली. एवढंच नाही तर या चित्रपटाने सलमान खानच्या करिअरला वेग दिला. 

नेहा चौधरी | Updated: Aug 21, 2023, 10:38 AM IST
पावडर विकणाऱ्या 'या' तरुणीला अचानक मिळाला सलमानचा चित्रपट, रातोरात झाली सुपरस्टार! title=
salman khan film tere naam actress bhumika chawla birthday Unknown Facts bollywood news in marathi

Bhumika Chawla Birthday : निरागस चेहरा, मोठे डोळ, पावडर ब्रँडची जाहिरात करणाऱ्या या तरुणीला मिळाली सलमान खानची हिरोईन बनण्याची ऑफर...आणि मग काय रातोरात सलमान खानसोबतची तिचं नशिब पालटलं. रातोरात सुपस्टार झालेली ही सलमान खानची (Salman Khan New Bald Look) ही अभिनेत्री आहे भूमिका चावला. तेरे नाम चित्रपटातून तिने चाहत्यांची मनं जिंकली. निरागसतेने तिने सगळ्यांना घायाळ केलं. सतत फ्लॉप चित्रपटांच्या संकटाशी झुंज देणाऱ्या सलमान खानला तेरे नाम हा चित्रपट (Salman Khan New Bald Look Video Viral) वरदान ठरला. या चित्रपट नुसता सुपरहिट नाही तर खूप लोकप्रिय झाला. (salman khan film tere naam actress bhumika chawla birthday Unknown Facts bollywood news in marathi)

आज सलमान खानच्या अभिनेत्रीची आठवण काढण्याचं कारण की, आज भूमिका चावला हिचा वाढदिवस आहे. (Bhumika Chawla Birthday) दिल्लीत 1978 मध्ये तिचा जन्म झाला. वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. तीन भावंडांमध्ये भूमिका शेंडी फळ. (Bhumika Chawla Unknown Facts) वडिलांची सतत बदली होत असल्याने देशाच्या कानकोपऱ्या फिरण्यासह तिचं शालेय शिक्षण वेगवेगळ्या शहरात झालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t)

अशी झाली करिअरची सुरुवात!

ग्लॅमरच्या दुनियेत यशाची स्वप्ने पाहत भूमिका 1997 मध्ये मायानगरी मुंबईत दाखल झाली. तिला सुरुवातीला म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम मिळालं. जीटीव्हीच्या 'हिप हिप हुर्रे' या शोमध्ये तिला काम मिळालं.  त्यानंतर पॉन्ड्स ब्रँडची पावडर जाहिरातीतून ती प्रसिद्ध झाली. त्यानंतर भूमिका साऊथ इंडस्ट्रीकडे वळली आणि तिला 2000 मध्ये युवाकूडू हा साऊथचा चित्रपट मिळाला.भूमिकाचा दुसरा चित्रपट 'खुशी' ज्या ती पवन कल्याणसोबत दिसली होती. हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजला आणि तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

अचानक 2003 मध्ये तिला तेरे नाम या बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने भूमिका आणि सलमान खानच्या करिअरला उंचावर येऊन ठेवलं. 'रन', 'सिलसिले', 'दिल ने जिसे अपना कहा' आणि 'दिल जो भी कहे' सारख्या अनेक चित्रपटात ती दिसली. भूमिकाने तिच्या करिअरमध्ये 64 चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय. आज तिची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीमध्ये केली जाते. 

नुकताच सलमान खानचा आलेला Kisi ka bhai kisi ki jaan मध्ये ती दिसली होती.  भूमिका सोशल मीडियावरही खूप सक्रीय असून इन्स्टाग्रामवर तिचे 1.4 मिलियनहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. 

4 वर्षांच्या अफेअरनंतर योग शिक्षकाशी लग्न!

भूमिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार, ती चित्रपटात येण्यापूर्वी योगा शिकत होती. भरत ठाकूर हे तिचे योग प्रशिक्षक होते. योगा शिकता शिकता ती भरत ठाकूर यांच्या प्रेमात पडली.

जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर भूमिका चावलाने 2007 त्यांनी लग्न केलं. नाशिकच्या गुरुद्वारामध्ये त्यांनी अगदी साधेपणाने लग्न केलं. फेब्रुवारी 2014 मध्ये त्यांना एक मुलगा झाला.