सलमानकडून कतरिनाला आई होण्याचा सल्ला

सध्याच्या घडीला ही जोडी चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे ते म्हणजे आगामी भारत हा चित्रपट.

Updated: May 29, 2019, 05:13 PM IST
सलमानकडून कतरिनाला आई होण्याचा सल्ला

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची संपूर्ण कलाविश्वात चर्चा सुरु असते. रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा अनेकांचं लक्ष वेधते. सध्याच्या घडीला ही जोडी चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे ते म्हणजे आगामी भारत हा चित्रपट. या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये सलमान आणि कतरिना व्यग्र आहेत. यानिमित्ताने ते विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहेत. अशाच एका कार्यक्रमात सलमानने कतरिनाला थेट लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. 

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत आणि चित्रपटाविषयी आपलं मत मांडत भाईजान सलमानने कतरिनाच्या लग्नाचा विषय काझला. मोठ्या मस्करीत त्याने तिला लग्नाचा सल्ला तर दिलाच. सोबतच इतक्यावरच न थांबता त्याने तिला आई होण्याचाही सल्ला दिला. सलमानचे हे सल्ले ऐकून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. तर काही प्रमाणात कतरिनानेही त्याचे सल्ले ऐकले. पण, तिचे एकंदर हावभाव पाहता सध्याच्या घडीला लग्न वगैरे करण्याचा आपला काहीच विचार नसल्याचं स्पष्ट झालं. 

लग्न, विवाहसंस्था, कुटुंब याविषयी कतरिनाने काही दिवसांपूर्वीच अरबाज खानच्या पिंच या चॅट शोमध्ये तिचे विचार मांडले होते. पण, करिअरला प्राधान्य देणाऱ्या कॅटने य़ेत्या काही दिवसांसाठी लग्नाचे बेत मात्र दूर ठेवले आहेत. त्यामुळे तिचा एकंदर अंदाज पाहता यंदा कर्तव्य नाही....असं म्हणणं वावगं ठरणार ऩाही. सलमान खानचा आगामी येणारी चित्रपट भारत हा ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याअगोदरच कोट्यावधीची कमाई केली आहे.