Salman Khan | सलमान खानला चावलेला साप अखेर सापडलाच

सलमान खानला (Salman Khan) चावलेला चावरा साप (Snake) अखेर सापडलाय.

Updated: Dec 26, 2021, 07:42 PM IST
Salman Khan | सलमान खानला चावलेला साप अखेर सापडलाच title=

पनवेल : बॉलिवूडचा भाईजान असलेल्या सलमान खानला (Salman Khan) चावलेला चावरा साप (Snake) अखेर सापडलाय. सलमानला पनवेलच्या (Panvel) फार्महाऊसमध्ये या सापाने दंश केला होता. त्यानंतर सलमानवर उपचारांसाठी पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) उपचार करण्यात आले. दरम्यान आता सलमानला ज्या भागात तो साप चावला होता त्या परिसरातून त्याला पकडण्यात आलं आहे. त्या सापाला पकडून बाटलीबंद केलं गेलं आहे. (Salman Khan Health update bitin snake found in Panvel Farm house Bollywood actor) 

सलमानचं पनवेलमध्ये वाजे गावात फार्महाऊस आहे. सलमान या फार्महाऊसवर अधूनमधून येत असतो. यावेळेस तो ख्रिसमस आणि वाढदिवसानिमित्त आला. मात्र त्याला आज मध्यरात्री साप चावला. त्यानंतर सलमानला मध्यरात्री 3 च्या दरम्यान MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

सलमानला चावलेला साप हा विषारी नव्हता. त्यामुळे रुग्णालयात सलमानवर प्रथमोपचार करुन त्याला सोडण्यात आलं. आता  सलमान अगदी ठणठणीत आहे. 

फार्महाऊसवर  वाढदिवसाची पार्टी? 

लाखो तरूणींच्या ह्दयाची धडकन असलेल्या सलमानचा उद्या म्हणजेच  27 डिसेंबरला वाढदिवस आहे. एका रिपोर्टनुसार, वाढदिवसानिमित्त त्यानं आपल्या खास मित्रांसाठी पनवेलच्या फार्महाऊसवर एक छोटीशी पार्टी आयोजित केल्याचं समजत आहे. अर्थात कोरोनामुळे यंदाही वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन असणार नाही.