मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांची लोकं आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. पण अलीकडेच त्याच्या एका अशा चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक नाही, दोन नाही, तीन नाही तर दहा अभिनेत्री दिसणार असून या चित्रपटाचं नाव आहे 'नो एंट्री'.
सलमानच्या चित्रपटात 10 अभिनेत्री असणार आहेत
यावेळी सलमान खानचं शेड्यूल पूर्णपणे टाइट आहे. भाईजान सतत चित्रपटांचं शूटिंग करत असतो. नुकतंच त्याने 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. याबाबतची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी आली होती की 'नो एंट्री'चा सीक्वल येणार आहे. ज्याचं नाव 'नो एंट्री में एंट्री' असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दहा अभिनेत्री असतील. मात्र, अद्याप या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
या चित्रपटासाठी फरदीनने वजन कमी केलं होतं
सलमान खानच्या आगामी नो एंट्रीच्या सीक्वलबद्दल एक अपडेट समोर आली आहे. ज्याचं शीर्षक 'नो एंट्री में एंट्री' असणार आहे. एका वृत्तानुसार, या सिक्वेलमध्ये 2005 मध्ये आलेल्या नो एंट्री चित्रपटाचा मुख्य नायक म्हणजेच सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी फरदीन खाननेही बरंच वजन कमी केलं आहे.