Salman Khan Films : एका पाठोपाठ एक फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर अभिनेता सलमान खानने त्याचं दुख: व्यक्त केलं आहे. टायगर 3 हा सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. मात्र हा सिनेमा जितका चर्चेत होता तितका तो बॉक्स ऑफिसवर चालला नाही. टायगर 3 ने अपेक्षेप्रमाणे कमाई केली नाही. याआधी फायनल: द फायनल ट्रुथ आणि किसी का भाई किसी की जान, बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरले. मात्र नकताच सलमान त्याचे चित्रपट फ्लॉप का ठरले जात आहेत यावर तो आता उघडपणे बोलला आहे आणि त्याचं दुखं व्यक्त केलं आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने किसी की भाई किसी का जान आणि अंतिम या त्याच्या दोन शेवटच्या सिनेमातील कामगिरीबद्दल वक्तव्य केलं. त्याच्या सिनेमाला फ्लॉप ठरण्यामागे अभिनेत्याने सिनेमाच्या तिकीट दराला जबाबदार धरले आहे. तिकीटांच्या किंमती आहेत. असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. हे दोन सिनेमा रिलीज झाले तेव्हा लोकं थिएटरमध्ये जात नव्हते. याशिवाय आम्ही थिएटरमध्ये जास्त दराने तिकिटे विकली नाहीत. ज्या दराने लोकांना थिएटरमध्ये जाणं सोयीचं होतं त्याच दरात आम्ही तिकिटं विकली. आम्ही प्रेक्षकांचे पैसे वाचवण्यावर लक्ष दिला आणि त्यामुळेच आमचा बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांचा क्रमांक खाली आला. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांचा निर्माता सलमानच होता.
अभिनेत्याने पुढे सांगितलं की, या दोन चित्रपटांची तिकीटाची किंमत 250 रुपयांपेक्षा जास्त नाही. आम्ही प्रेक्षकांच्या पैसे वाचवण्याचा विचार केला. जर 'किसी का भाई किसी की जान' आज रिलीज झाला असता तर आम्ही अजून कमाई केली असती. असं वक्तव्य अभिनेत्याने या मुलाखतीत केलं आहे. मात्र सलमानने या सगळ्यावर संताप व्यक्त करत सांगितलं आहे की, त्याच्या पुढच्या चित्रपटांची तिकिटे महागणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याने पुढे सांगितलं की, आगामी सिनेमात भाई असेल. कारण तुम्ही लोकं (मीडिया) जे आम्ही करतो त्याचा आदर किंवा कौतुक नाही करत. आता आम्ही आमचा नंबर वाढवून दाखवू. असं वक्तव्य अभिनेता सलमान खानने केलं आहे.