मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानची भावनिक प्रतिक्रिया

वाजिद खान यांच्या निधनावर सलमानचं ट्विट

Updated: Jun 1, 2020, 03:45 PM IST
मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई : प्रसिद्ध म्यूझिक डायरेक्टर वाजिद खान यांचं रविवारी निधन झालं. वाजिद यांच्या अनाचक जाण्याने अनेक बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

वाजिद खान यांचा जवळचा मित्र सलमान खानने देखील ट्विट करत वाजिद खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सलमान खानने म्हटलं की, वाजिदसाठी नेहमी प्रेम आणि सन्मान राहिल. वाजिदचं टॅलेंट आणि व्यक्तीमत्व नेहमी लक्षात ठेवेल. खूप सारं प्रेम. तुझ्या सूंदर आत्म्याला शांती लाभो.

वाजिद-साजिदची जोडी सलमानसाठी नेहमी खास होती. दोघांनी सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरवात केली. साजिद-वाजिदची जोडी सलमान खानची फेव्हरेट होती. दोघं भावांनी सलमान खानच्या अनेक सिनेमांनी गाणी दिली. सगळे गाणे हिट ठरली. सलमानचा सिनेमा साजिद-वाजिदच्या गाण्यांमुळे आणखी हिट होत होते.

साजिद-वाजिदने सलमानच्या तुमको ना भूल पाएंगे, तेरे नाम, गर्व, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हॅलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वान्टेड, मे और मिसेज खन्ना, वीर, दबंग, नो प्रॉब्लम, एक था टायगर सिनेमांसाठी गाणी दिली होती. साजिद-वाजिद सलमानचे फेव्हरेट होते. बिग बॉस 4 आणि बिग बॉस 6 चं टायटल ट्रॅक देखील या दोघांनीच बनवला होता. दोघं भाऊ बिग बॉसच्या सेटवर देखील दिसायचे.

वाजिदने सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटामध्ये आवाज देखील दिला होता. ज्यामध्ये पांडे जी सीटी बजाए, फेविकॉल से, माशाअल्लाह, हमका पीनी है, हुड हुड दबंग, डू यू वॉन ए पार्टनर, सोनी दे नखरे या गाण्यांसाठी आवाज दिला होता.