गुपित लग्नाच्या चर्चेनंतर, सलमानने शेअर केला मुलासोबतचा फोटो ?

सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला गेला आहे.

Updated: Aug 28, 2021, 10:21 AM IST
गुपित लग्नाच्या चर्चेनंतर, सलमानने शेअर केला मुलासोबतचा फोटो ? title=

मुंबई : सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला गेला आहे. चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खुद्द सलमान खानने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो त्याच्या भाच्यासोबत दिसत आहे.फोटो बघून अंदाज लावणे कठीण आहे की हे फोटो रशियाचे आहे की अन्य कुठले. सलमान खानने त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तो त्याचा लहान भाऊ सोहेल खानच्या मुलासोबत दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सलमान खान जीन्स-टी-शर्ट आणि कॅप अशा लूकमध्ये सगळ्याचं लक्षवेधून घेत आहे . त्याच वेळी, त्याचा पुतणा निर्वाण खानचा कार्गो-टी-शर्टसह जॅकेटमध्ये कूल अंदाज दिसत आहे आणि त्याने स्टाईलिश चष्मा लावला आहे . 
सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,  'काका पुतण्या.' एका चाहत्याने त्याच्या फोटोवर लिहिले, 'पण काका जास्त देखणा आहे.', दुसऱ्याने लिहिले, 'तू इतका सुंदर का आहेस?'  
सलमान खानच्या फोटोवर 13 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.

सलमान रशियामध्ये सुमारे 2 महिने 'टायगर 3' चे शूटिंग करणार आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर टायगर फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इम्रान या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. सलमान शेवटचा 'राधे' सिनेमात दिसला होता. आगामी काळात तो 'कभी ईद कभी दिवाळी' आणि 'अंतिम' सारख्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.