मुबई : पंजाबी सिंगर सिद्धु मुसेवाला (sidhu moose wala) हत्या प्रकरण ताजे असतानाचं बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खानला (Salman Khan) हत्येची धमकी आल्याची घटना समोर आली होती. या दोन्ही घटनेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव चर्चेत होते. आता या घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. शार्पशूटरच्या निशाण्यावर देखील सलमान होता. मात्र काही कारणामुळे या शार्पशुटरला सलमानला न मारताचं माघारी परतावे लागले होते.
सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) निशाण्यावर होता. अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमकीच्या पत्राने मोठी खळबळ उडाली होती. या पत्रात 'सलमान खानचही सिद्धु मुसेवाला करणार' अशी धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोईने याआधी सुद्धा धमकी दिली असल्याने संशयाची सुई पुन्हा त्याच्याजवळच आली. तसेच मुसेवाला हत्याप्रकरणातील बिश्नोईच्या सहभागाने सलमानच्या घटनेतील आरोपीही तोच असणार याचा दाट संशय होता.
लॉरेन्स बिश्नोईचा चौकशीत खुलासा
सिद्धु मुसेवाला (sidhu moose wala) आणि सलमान खान (Salman Khan) प्रकरणी पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईवर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिश्नोईने सलमानला मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईने संपत मेहराला अभिनेता सलमान खानला मारण्यास सांगितले, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi) 2021 मध्ये एजन्सीने चौकशी केली होती, या चौकशीत लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली देताना मोठा खुलासा केला होता.राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सलमान खानला मारायला सांगितले होते, त्यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला होता. संपतने मुंबईत सलमान खानचे घर देखील गाठले होते. संपतकडे पिस्तुल होती, मात्र घराबाहेरून लांबून निषाणा साधन अवघड जात होतं. त्यानंतर संपत नेहराने आपल्या गावातील दिनेश फौजी यांच्यामार्फत आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डर दिली. बिश्नोईने त्याच्या ओळखीचा अनिल पंड्या यांच्याकडून स्प्रिंग रायफल ३ ते ४ लाखांना खरेदी केली. मात्र पोलिसांनी या आरोपींना तपास करत दिनेशला अटक केली त्यानंतर संपत नेहराला अटक केली. 2018-19 मध्ये बिष्णोईने हा कट रचल्याचे सूत्रांनी सांगितले.