सलमान खानसोबत व्हिडोओत दिसणारी सुंदर मुलगी नेमकी कोण?

 सलमान खानचा व्हिडिओ कोणताही असो, सोशल मीडियावर तो व्हायरल होणार हे नक्की.

Updated: Dec 22, 2021, 07:26 PM IST
  सलमान खानसोबत व्हिडोओत दिसणारी सुंदर मुलगी नेमकी कोण?  title=

मुंबई  : सलमान खानचा व्हिडिओ कोणताही असो, सोशल मीडियावर तो व्हायरल होणार हे नक्की. असाच एक थ्रोबॅक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे. ज्यामध्ये भाईजान डान्सची रिहर्सल करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खानसोबत एक मुलगी 'आवारा दिल मेरा' या गाण्याची रिहर्सल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड होऊ लागला आहे. ज्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ सलमान खानच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये सलमान खूपच मस्त स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. ज्या मुलीसोबत सलमान खान डान्स करताना दिसत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून सई मांजरेकर आहे. सई सलमानच्या दबंग ३ या सिनेमात दिसली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ द-बँग शो दरम्यानचा आहे. जो नुकताच दुबईत पार पडला.

या व्हायरल व्हिडिओत स्टेप्स मॅच करत सलमान परफेक्ट डान्स करतोय. हा व्हिडिओ सलमानच्या फॅनपेजवरुन शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'सलमान भाई की रिहर्सल'. त्याचबरोबर लोकांच्या या व्हिडिओवर  जोरदार कमेंट येत आहेत. यावर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, 'या मुलीचं नाव प्लीज काय आहे ते सांगा', तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, 'दोघंही अप्रतिम आहेत आणि दोघांचे एक्सप्रेशनही जबरदस्त आहेत'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवट 'अंतिम' चित्रपटात दिसला होता. यामध्ये सलमानची बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्मा त्याच्यासोबत दिसला होता. सध्या सलमान खान बिग बॉसचा १५वा सीझन होस्ट करत आहे. आगामी काळात तो कतरिना कैफसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे.