मुंबई : अभिनेता सलमान खान जसस बॉलिवूडमध्ये रूपेरी पदद्यावर दबंगस्टार म्हणून ओळखला जातो तसाच तो 'बीईंग ह्युमन' या संस्थेच्या मार्फत अनेक गरजूंना मदतदेखील करतो.
सलमान खानसोबत 1995 साली 'वीरगती' या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत पूजा डडवाल झळकली होती. मात्र सध्या ती शिवडीच्या टीबी रुग्णालयात टीबी आजाराशी झुंजत आहे अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
@BeingSalmanKhan veergati's actress pooja dadwal waiting for your financial help pls help her she is admitted in shewri tb hospital Mumbai
— Shariq hasan (@hasan_shariq) March 19, 2018
@BeingSalmanKhan bhai, veergati ki actress Pooja is critical at mumbai’s shivdi hospital, she is suffering frm TB, unable to pay her bills and get proper treatment, help her
— Praveen Chand (@prvvvn) March 19, 2018
पूजाच्या आजारपणामुळे तिच्या परिवारातील व्यक्ती आणि पतीने तिला सोडले आहे. आजारामुळे पूजाची शारिरीक स्थिती आणि आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खानने तिला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सुरूवातीच्या काळात पूजा डडवाल हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करत होती. 'वीरगती','सिंदूर की सौगंध' या चित्रपटामध्ये पूजा झळकली होती. त्यानंतर गोव्यामध्ये ती कॅसिनो मॅनेज करत होती. मात्र टीबी आजाराच्या विळख्यात अडकल्यानंतर मात्र तिची आता स्थिती नाजूक झाली आहे.