आता सलमानची 'या' अभिनेत्रीसोबत चर्चा

सेटबाहेर दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे.   

Updated: Jan 24, 2021, 08:39 AM IST
आता सलमानची 'या' अभिनेत्रीसोबत चर्चा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खानचं नाव याआधी अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं आहे. सध्या 'अंतिम- द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या सलमानचं नाव एका नव्या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं आहे. ज्या अभिनेत्रीसोबत सध्या सलमानचं नाव जोडलं जात आहे. त्या अभिनेत्रीचं नाव प्रज्ञा जैसवाल असून ती सलमानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. 

'अंतिम- द फाइनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) या चित्रपटामध्ये सलमान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे. तर अभिनेता आयुष शर्मा (Aayush Sharma) चित्रपटात एका गँगस्टरची व्यक्तीरेखा साकारणार आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रज्ञाला सलमानच्या कारमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. शिवाय त्या दोघांना फोटो क्लिक करताना देखील पाहण्यात आलं होतं. हे फोटो सलमानच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील असल्याचं सांगण्यात येत आहे. याचवेळी सलमान आणि प्रज्ञाला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. 

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार चित्रपटात टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना देखील दिसणार असून ती आयुष शर्माच्या अपोझीट भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची शुटिंग अंतिम टप्प्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपट याच वर्षी प्रदर्शित करण्याचा सर्व टीमचा विचार आहे. 

तर सलमानच्या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना अभिनेता वरूण धनवची खास उपस्थिती लाभणार आहे. चित्रपटाच्या गणपती गाण्यावर वरूण, सलमान आणि आयुष एकत्र ताल धरताना दिसणार आहेत.