एका अभिनेत्रीमुळं सलमानची वाईट अवस्था; आजही विसरला नाहीये भाईजान

त्या एका चित्रपटामुळे सलमानवर आली अशी परिस्थिती

Updated: Oct 16, 2021, 11:15 AM IST
एका अभिनेत्रीमुळं सलमानची वाईट अवस्था; आजही विसरला नाहीये भाईजान

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने हिंदी चित्रपटसृष्टीत 'बीवी होता ऐसी' या चित्रपटातून पदार्पण केले, पण त्याला सर्वाधिक लोकप्रियता 'मैने प्यार किया' या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात सलमान खान अभिनेत्री भाग्यश्रीसोबत दिसला होता. चित्रपटातील दोघांची जोडी आणि केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीचं आवडली होती. एवढंच नाहीतर बॉक्स ऑफिसवरही चित्रपट प्रचंड हिट ठरला. पण चित्रपट हिट ठरल्यानंतर देखील सलमान खान काही महिने बेरोजगार होता. यासाठी त्याने भाग्यश्रीला दोष दिला.

सलमान खानने 'आप अदालत' मधील 'मैने प्यार किया' चित्रपटाशी संबंधित खुलासा केला. चित्रपटाबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, ''मैने प्यार किया'' नंतर मला 4-5 महिने कोणतेही काम मिळाले नाही. असे वाटत होते की तिला काम मिळेल की नाही? कारण भाग्यश्री मॅडमने त्यावेळी ठरवले होते की ती आता चित्रपटात काम करणार नाही तर लग्न करेल..'

भाग्यश्रीबद्दल बोलताना सलमान खान पुढे म्हणाला होता, "भाग्यकश्रीने जाऊन लग्नही केले. या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय घेऊन ती पळून गेली. लोकांना असे वाटले की चित्रपट फक्त तिच्यामुळे गाजला. जिच्यामुळे चित्रपट हिट झाला होता.. मला असं वाटत होतं मी चित्रपटात माझा काही भागचं नाही...

महत्त्वाचं म्हणजे चित्रपटासाठी सलमान खानला फक्त 31 हजार रुपये दिले होते, परंतु त्यानंतर अभिनेत्याच्या मेहनतीमुळे त्याला 75 हजार दिले. आज देखील चित्रपटातील गाण्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.