शेहनाजला मिळाली नवी साथ; फोटो शेअर करताचं चर्चांना उधाण

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शेहनाजला दुःख विसरण्यासाठी मिळाली खास व्यक्तीची साथ

Updated: Oct 16, 2021, 10:12 AM IST
शेहनाजला मिळाली नवी साथ; फोटो शेअर करताचं चर्चांना उधाण

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज सोशल मीडियापासून दूर होती. आता शेहनाज 'हैसला रख' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शेहनाज आता बाहेर आली आहे. शेहनाज चित्रपटाचं प्रमोशन करत असली तरी तिच्या चेहऱ्यावरील आनंद कमी झाला आहे. चाहत्यांनामात्र शेहनाजच्या आनंदामागील दुःख समजतंय. 

शेहनाजला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तिचा मित्रपरिवार आणि कुटुंब तिच्यासोबत आहे.  'हैसला रख' चित्रपटातील शेहनाजचा सहकलाकार दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये शेहनाजचे आभार मानत  'तू एक खंबीर स्त्री आहेस... कायम अशीचं राहा...' असं म्हणाला आहे. 

सांगायचं झालं तर शेहनाजला तिचं दुःख विसरण्यासाठी मित्रांची साथ मिळत आहे. 'हैसला रख' चित्रपटात शेहनाज एका मुलाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर प्रथमच शहनाज रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. त्यामुळे सिडनाजचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

चित्रपटात  तिच्यासोबत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ दिसणार आहे. 'हौसला रख' चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अमरजीत सिंग सरोन यांच्या खांद्यावर हेती. चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे.