Samantha - Naga Baby Planning : घटस्फोटाच्या चर्चेत सामंथा - नागा चैतन्य बाळाच्या तयारीत?

नागा चैतन्य - सामंथा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेत ही खासगी बाब आली समोर 

Updated: Sep 30, 2021, 07:52 AM IST
Samantha - Naga Baby Planning : घटस्फोटाच्या चर्चेत सामंथा - नागा चैतन्य बाळाच्या तयारीत? title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि त्याची पत्नी सामंथा अक्किनेनी यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. यातच नागा चैतन्यच्या 'LOVE STORY' सिनेमाच्या सक्सेस पार्टीत सामंथा अक्किकेनी सहभागी झाली नाही. यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला आणखी उधाण आलं. असं असताना या दोघांच्या खासगी आयुष्याबाबतची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

अभिनेता नागा चैतन्य आणि त्याची पत्नी सामंथा अक्किकेनी हे दोघं आपलं कुटुंब आणखी वाढवण्याचा विचार करत होते. या दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचा विचार केला होता. लोकल मीडिया आऊटलेट ग्रेट आंध्रांच्या माहितीनुसार, सामंथाने सध्या नवीन प्रोजेक्ट साईन करणं टाळलं होतं. एवढंच नव्हे तर ती नव्या प्रोजेक्टच्या स्क्रीप्ट देखील वाचत नव्हती. 

गेल्या काही आठवड्यांपासून, सामंथा आणि नागाच्या घटस्फोटाबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. सामंथाने आडनाव 'अक्किनेनी' तिच्या सोशल मीडिया पेजवरून वगळल्यानंतर या चर्चांना उधाण आलं. त्याचप्रमाणे सासरे अभिनेता नागार्जुनच्या वाढदिवसालाही सामंथा उपस्थित नव्हती. एवढंच नव्हे तर नागा चैतन्यच्या 'लव्ह स्टोरी' सिनेमाच्या सक्सेस पार्टीतही सामंथा दिसली नाही.

एवढेच नाही तर बॉलीवूड अभिनेता आमिर खान नागाच्या लव्ह स्टोरी या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी आला. तेव्हा देखील सामंथा कौटुंबिक डिनरलाही उपस्थित नव्हती. सामंथाने अलीकडेच तिच्या मुंबईत शिफ्ट होण्याविषयीचा एक मोठा खुलासा केला आहे. 

ग्रेट आंध्रच्या म्हणण्यानुसार, सामंथा आणि नागा यांनी आपले कुटुंब वाढवण्याची आणि बाळाच्या जन्माचं प्लानिंग केलं आहे. यामुळेच सामंथा यांनी नवीन प्रकल्प घेणे थांबवले आहे आणि नवीन स्क्रिप्ट ऐकणे बंद केले आहे. सामंथा खूप कौटुंबिक आहे. ती पहिला कुटुंबाचा विचार करते. पण सामंथाच्या प्रेग्नेसींची बातमी पहिल्यांदा समोर आलेली नाही. तिच्या लग्नापासूनच या चर्चांना उधाण आलं आहे.