समीर वानखेडे वादात आल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री क्रांती रेडकरचं ट्वीट

आर्यन खानला अटक करणारे एनसीबी अधिकारी समिर वानखेडे यांची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Updated: Oct 25, 2021, 09:17 PM IST
समीर वानखेडे वादात आल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री क्रांती रेडकरचं ट्वीट

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सध्या जोरदार चर्चा आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आता वादाच्या भोवऱ्यात फसल्याचं दिसत आहेत. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.  समीर यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज प्रकरणात सातत्याने कारवाई करण्यात आली आहे. त्यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडे, समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांच्या विरोधात समीर यांच्या समर्थनासाठी पुढे आली आहे. 

क्रांती रेडकरने केलं ट्विट
समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडेने काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे. तिने ट्विट करून म्हटलं आहे की, 'जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्द दिशेने पोहत असता, तेव्हा तुम्ही बुडू शकता, पण जर देव तुमच्यासोबत असेल, तर कोणतीही लाट इतकी मोठी नसते की, ती तुम्हाला इजा होवू शकते. कारण सत्य फक्त त्यालाच माहीत असतं. शुभ प्रभात. सत्यमेव जयते.' क्रांतीचे हे ट्विट येताच ते व्हायरल झालं आहे.

प्रभाकर साईने केले अनेक आरोप 
प्रभाकर साईंनीही समीर वानखेडेवर गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईचा पहिला आरोप आहे की, त्याला साक्षीदार बनवण्यासाठी साध्या कागदावर सही करायला लावली होती. दुसरा आरोप म्हणजे NCB ने पंचनामा पेपर सांगून त्यावर सही केली. तिसरा आरोप म्हणजे 18 कोटी रुपयांचा सौदा झाला. चौथा आरोप समीर वानखेडेने आठ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आहे. प्रभाकर हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड आहे. ज्याचा आर्यन खानसोबतचा फोटो समोर आला होता. आता किरण गोसावी फरार आहे. त्याच्यावर फसवणूक आणि बनावटगिरीचे अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.

नवाब मलिक यांनीही केले आरोप 
नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप केला. दुबईचे फोटो शेअर करत त्यांनी दावा केला होता की, समीर तिथे बॉलिवूड सेलेब्सना भेटला होता. याशिवाय समीर वानखेडेच्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नवाब मलिक यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये समीरच्या पहिल्या लग्नाचा उल्लेखही केला आहे. समीरचे पहिलं लग्न मुस्लिम मुलीशी झालं होतं. असा त्यांचा दावा आहे. याशिवाय त्यांच्या जन्म प्रमाणपत्राचा फोटोही शेअर करण्यात आला असून, त्यात समीरचे नाव समीर दाऊद वानखेडे आहे. तसं, समीरने या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे आणि सगळ्या आरोपांना फेटाळून लावलं आहे.

कोण आहे क्रांति रेडकर
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर एक अभिनेत्री आहे. क्रांती रेडकर वानखेडे यांचा पहिला चित्रपट हा मराठी चित्रपट होता. त्यांनी 'सून असावी अशी' मध्ये काम केलं. यामध्ये त्याच्यासोबत अंकुश चौधरी दिसला होता. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने अजय देवगणच्या 'गंगाजल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.