नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग अभिनेत्याचं निधन, ब्रेन डेड झाल्यानं मनोरंजन विश्वावर शोककळा

1 वर्षापूर्वी याच दिवशी सुशांत सिंह राजपूतला गमवलं आणि आज नॅशनल अॅवॉर्ड विनिंग अभिनेत्याचं निधन झालं

Updated: Jun 14, 2021, 02:10 PM IST
नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग अभिनेत्याचं निधन, ब्रेन डेड झाल्यानं मनोरंजन विश्वावर शोककळा title=

मुंबई: सुशांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी, 1 वर्षापूर्वी याच दिवशी सुशांतने आत्महत्या केली होती. मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आजच आणखी एक बातमी समोर येत आहे. नॅशनल अॅवॉर्ड विनिंग अभिनेत्याचं निधन झालं. 2 दिवसांपूर्वी रस्ते अपघातात या अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली होती. आज या अभिनेत्याचं उपचारा दरम्यान निधन झालं.

नॅशनल अॅवॉर्ड विनिंग कन्नड अभिनेता संचारी विजय याने वयाच्या 37 व्या वर्षी रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री बंगळुरू इथे त्याचा अपघात झाला होता. या अपघातात संचारी विजयला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

संचारी विजय या अभिनेत्याचा ब्रेन डेड झाल्याची घोषणा डॉक्टरांनी आज हेल्थ बुलेटिननंतर केली. या घटनेमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर संचारी विजयच्या कुटुंबियांनी त्याचे अवयव दान करणार असल्याचं सांगितलं आहे.

लॉकडाऊन दरम्यान संचारी विजयने अनेकांना मदत केली होती. गरजूंना मदत करण्यापासून ते ऑक्सिजनपर्यंत त्याने अनेक गोष्टीत मदतीचा हात पुढे केला होता. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर चाहते त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तर चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.