सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरण : सेलिब्रिटी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

चाहत्यांना बसला मोठा धक्का 

Updated: Sep 15, 2020, 06:16 PM IST
सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरण : सेलिब्रिटी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणात सेंट्रल क्राइम ब्रांच (CCB) आरोपींचा शोध घेत आहेत. यामध्ये आता एका सेलिब्रिटी दाम्पत्याचाही समावेश आहे. कन्नड सिनेमातील टॉप अभिनेता दिगनाथ मन्छले आणि त्याची पत्नी एंद्रिता रे यांना बंगलुरू पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे आहेत. 

३६ वर्षीय दिगनाथ मन्छले गेल्या १५ वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहे. दिगनाथ हे कन्नड सिनेमात अतिशय टॉपमधील अभिनेता म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० सिनेमांत काम केलं आहे.  ड्रग रॅकेटमध्ये त्याचं नाव आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्यासोबतच पत्नी एंद्रिता रेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Buddh circuit 

A post shared by diganthmanchale (@diganthmanchale) on

३० वर्षीय एंद्रिता देखील कन्नड सिनेमातील ओळखीचं नाव आहे. तिने आतापर्यंत ३० सिनेमांमध्ये काम केलं आहे. सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणात अनेक कलाकारांची नाव समोर आली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा देखील बंगलुरू पोलिसांच्या ताब्यात आहे. बंगलुरू ज्वाइंट कमिशनर क्राइम संदीप पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अल्वाच्या 'हाऊस ऑफ लाइव्स' या घराचं सर्च वॉरंट देखील जारी केलं आहे.