संजय दत्तने 'तोंडाने फोडले फटाके', फोटोग्राफर्सवर भडकला आणि...

त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला आणि तो कॅमेरामॅन्सवर बरसला.

Updated: Nov 8, 2018, 07:42 PM IST
संजय दत्तने 'तोंडाने फोडले फटाके', फोटोग्राफर्सवर भडकला आणि...

मुंबई : सध्या देशभरात दिवाळीची धामधूम आहे. बॉलीवुडमध्येही हा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक सेलिब्रेटी दिवाळी नीमित्ताने आपल्या जवळच्यांना पार्टीसाठी आमंत्रित करताहेत. काल रात्री संजय दत्तच्या घरीही अशाच पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये संजय दत्तच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रण होत. पार्टी संपल्यावर  संजय दत्त अनेकदा आपल्या मित्रांना सोडायला बंगल्याखाली यायचा. इथे त्याची गाठ घराबाहेर असलेल्या कॅमेरामन्ससोबत व्हायची.

कॅमेरामॅन्सना शिव्या 

दरम्यान संजय मान्यता आणि मुलांसोबतही खाली उतरला. त्याने बाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामॅनसाठी पोजही दिल्या. तुम्ही जेवणार का ? असंही संजय दत्तने त्यांना विचारलं. पण त्यानंतर थोड्या वेळात त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला आणि तो कॅमेरामॅन्सवर बरसला.

'तुम्ही आपआपल्या घरी जा...परिवारासोबत दिवाळी साजरी करा'...'आम्हाला आमच्या बॉसने हे करायला सांगितलंय', असं काही कॅमेरा पर्सन्सनी यावेळी संजय दत्त ला सांगितलं. त्यावेळी संजयने त्यांच्या बॉसला ही अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली.

'दारू बोलते'

संजय दत्त मीडियावर भडकण्याची ही काही पहिली वेळ नाहीयं. मीडियाला त्याच्या अशा वागण्याची सवय झालीयं.

त्यामुळे त्याला कोणी काहीच बोलत नाही. काही पेग पोटात गेल्यावर जे काही बोलते ते दारू बोलत असते असं म्हटलं जात. पण कोणत्याही सणाच्या दिवशी कोणी काम करावं हे संजय दत्तला मुळात आवडत नाही.