सिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर

करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. 

Updated: Jan 24, 2018, 02:30 PM IST
सिनेमागृहा आधी 'पद्मावत' दिसला टेलिव्हिजनवर   title=

मुंबई : करणी सेनेच्या विरोधानंतर संजय लीला भंसाळी यांच्या बहूप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला विरोध झाला. या विरोधानंतर चित्रपटात काही बदल करून 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. 

सिनेमातील काही गोष्टींवर आक्षेप घेतल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे गेलं असलं तरीही या चित्रपटाच्या कथेवर आधारित एक मालिका 30 वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर आली होती.  

कोणती मालिका ? 

1988 साली दुरदर्शनवर 'भारत एक खोज' नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. 'पद्मावत' सिनेमा या '5' कारणांसाठी पहायलाच हवा !

संजय लीला भंसाळींचे एडिंटींग 

26 भागांची ही मालिका 'पद्मावती'ची गाथा या नावाने दाखवण्यात आली होती. 'पद्मावत' चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भंसाळींनी केले आहे. पण 30 वर्षांपूर्वी त्यांनी या मालिकेचे एडिटिंग केले होते. श्याम बेनेगल यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 

ओम पुरी खिल्जीच्या भूमिकेत  

एपिसोड  सीरीजमध्ये अल्लाउद्दीन खिल्जीने पद्मावतीला आरशात पाहिल्याचे आणि महाराजा रावल रतन सिंहने खिल्जीच्या अटींना मान्यता दिल्याचे दाखवण्यात आले होते. 

मालिकेत ओम पुरी 'अल्लाउद्दीन खिल्जी', राजेंद्र गुप्ता महाराजा रावल रतन सिंह आणि सीमा केळकर पद्मावतीच्या भूमिकेत दिसला होता.

1303 साली खिल्जीने चित्तोड गडावर चढाई केली होती. त्याची लूट केल्याची माहिती ओमपुरींच्या आवाजात सांगण्यात आली होती. मुव्ही रिव्ह्यू : राजपूत लोकांची आन, बान आणि शान दाखवणारा ‘पद्मावत’