संजूबाबा म्हणतो, 'विरासतसे नही काबिलीयत से'...

प्रस्थानम' चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवाणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

Updated: Aug 8, 2019, 03:21 PM IST
संजूबाबा म्हणतो, 'विरासतसे नही काबिलीयत से'... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'प्रस्थानम' चांगलाच चर्चेत आहे. 'हक दोगे तो रामयाण शुरू होगी, और छिनोगे तो महाभारत...' असं म्हणत संजू बाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर चित्रपटा बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचा पोस्टर जारी करण्यात आला आहे. खुद्द संजयने हा पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. पोस्टर शेअर करत, कॅप्शनमध्ये 'विरासतसे नही काबिलीयत से' असे संजयने म्हंटले आहे.   

चित्रपटाची कथा राजकारणा भोवती फिरताना दिसत आहे. आपल्या हक्कांच्या मागणीवर लढताना दिसत आहेत. चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटात संजय दत्त बलदेव प्रताप सिंह ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

होम प्रॉडक्शनच्या खाली साकारण्यात आलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवाणी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात संजय दत्त शिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, मनीषा कोयराला, चंकी पांडे आणि अली फजल हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.