व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री

भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 5, 2017, 09:49 PM IST
व्हिडिओ: 'बिग बॉस ११'ची कंटेस्टंट सपना चौधरीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री  title=

नवी दिल्ली : भारतातील छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चीत असलेला शो 'बीग बॉस' मधल्या सपना चौधरीची आता बॉलिवूडमध्येही एण्ट्री झाली आहे. या आधीही अनेक मंडळींना बिग बॉसमुळे बॉलिवूडची दारे किलकीली झाली आहेत. त्यात आता सपनाचा नंबर लागलाय.

सपना चौधरी ही एक हरियाणवी डान्सर आहे. आपल्या नृत्य आणि वादविवादांमुळे ती यापूर्वीही चर्चेत राहीली आहे. त्याचाच फायदा मिळून तिला बिग बॉससारखा चर्चीत शो मिळाला. सपनाला बिग बॉसच्या ११व्या पर्वात संधी मिळाली. त्यामुळे तिच्याभोवतीचे चर्चीत वलय वाढले. आता तर, तिला बॉलिवूडमध्येच एण्ट्री मिळाली आहे. यापूर्वी बिग बॉसच्या १०व्या पर्वात असलेले मनू पंजाबी, मनवीर गुर्जर आणि नितिभा कौल यांसह काही मंडळींचे आयुष्य बदलून गेले आहे. आता सपनाचेही आयुष्य बदलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, सपना सध्या बिग बॉसमध्ये आहे. पण, तिला बिग बॉसमध्ये संधी मिळण्यापूर्वीच तिला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता. सध्या ती जर्नी ऑफ बॅंगओव्हर सिनेमाच्या माध्यमातून 'लव बाईट' गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. गाण्याचा टीजर टी-सीरीजच्या बॅनरखाली रिलीज झाला आहे.