चाहत्यांना मोठा धक्का... सपना चौधरी रुग्णालयात दाखल

सपना चौधरीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, रुग्णालयातील तो व्हिडीओ हादरवणारा....   

Updated: Mar 15, 2022, 02:57 PM IST
चाहत्यांना मोठा धक्का... सपना चौधरी रुग्णालयात दाखल title=

मुंबई : प्रसिद्ध हरियाणवी डान्सर, गायक आणि अभिनेत्री सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. लग्नापासून सपना सतत आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सपना चौधरीने आता पुन्हा एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या नवा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सपनाची प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

खुद्द सपनाने रुग्णालयातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'मी आता ठिक आहे. तुम्ही दिलेल्या आशिर्वादासाठी धन्यवाद...' सध्या तिचा रुग्णालयातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सपनाता व्हिडीओ पाहून, तुला नक्की काय झालंय, रुग्णालयात का दाखल झालीस? असे प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सपनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकृती ठिक नसल्याची माहिती दिली होती. 

सपना चौधरीचे नाव आता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती देशभर स्टेज शो करते. इतकंच नाही तर सपनाने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या गाण्याची चर्चा कायम रंगलेली असते...

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x