मुंबई : अलीकडेच विकी कौशल आणि सारा अली खान यांना एकत्र पाहण्यात आलं. यादरम्यान पापाराझींना या दोघांनी पोज दिली आणि फोटो क्लिक केले. दरम्यान, पापाराझींनी विकी कौशलला असा प्रश्न विचारला, जो ऐकून सारा अली खान स्वतःला रोखू शकली नाही आणि जोरजोरात हसायला लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हसू लागली सारा अली खान
व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि विकी कौशल यांनी मास्क घातलेले दिसत आहेत. दोन्ही स्टार्स फोटोग्राफर्ससमोर येऊन फोटो काढतात. दरम्यान, एका फोटोग्राफरने विकी कौशलला विचारलं, 'विकी भाई लग्न कधी आहे?' हे ऐकून विकी कौशल काहीच उत्तर देत नाही, पण सारा अली खान हसू लागते.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्न करणार आहेत. मात्र, या वृत्तांवर दोन्ही बाजूंनी अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा रोका समारंभ पार पडल्याचीही बातमी समोर आली आहे. पण, लवकरच त्यांच्या टीमने ही बातमी अफवा असल्याचं म्हटलं आहे.
विकी कौशलने लग्नाबाबत दिलं उत्तर
एका मुलाखतीदरम्यान विकी कौशलने सांगितलं की, कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या बातमीवर त्याने प्रतिक्रिया का दिली नाही. विकी कौशल म्हणाला, खरं सांगायचं तर ती जागा नव्हती. कारण मी शूटिंग करत होतो. प्रसारमाध्यमांच्या वतीने सकाळी 9 वाजल्यापासून या अफवांना सुरुवात झाली आणि दुपारी 4.30 वाजेपर्यंत त्यांनी स्वत:च त्याचं खंडन करत हे वृत्त खोट असल्याचं सांगितलं. त्यामुळे याबद्दल काही बोलायचं नाही असंही तो म्हणाला.